Numerology Of Mulank 3 : ज्याप्रकारे वैदिक ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या नावावरुन कुंडली बघितली जाते. त्यानुसार व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य ठरवलं जातं. त्याच पद्धतीने अंकशास्त्रात (Ank Shastra) व्यक्तीच्या जन्मतिथीवरुन त्याच्याविषयी अधिक माहिती काढता येते. यामध्ये व्यक्तीच्या जन्मतिथीसह मूलांकाच्या आधारे सुद्धा स्वभावापासून ते भविष्यापर्यंतच्या गोष्टींचा अंदाज लावता येतो.
आज आपण मूलांक 3 च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मूलांक 3 चा स्वामी ग्रह गुरु ग्रह बृहस्पती आहे. त्यानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. गुरु ग्रह या जन्मतारखेच्या लोकांना सुख-समृद्धी आणि संपदा प्रदान करतो.
कसा असतो स्वभाव?
अंकज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 3 असणारे लोक फार सकारात्मक विचाराचे असतात. हे लोक स्वत:ला परफेक्शनिस्ट समजतात. तसेच, आपल्या आजूबाजूला हे लोक सकारात्मक वातावरण निर्माण करतात. तसेच, जगा आणि जगू द्या अशी यांची विचारसरणी असते.
प्रामाणिक आणि विश्वासू असतात
या जन्मतारखेचे लोक फार प्रामाणिक आणि विश्वासू वृत्तीचे असतात. आपल्या प्रिय व्यक्तींना नेहमी आनंदी कसं ठेवता येईल याचा हे विचार करतात. तसेच, इतरांना ज्ञान देण्यातही हे लोक फार तरबेज असतात. कोणत्याही वाईट सवयींपासून हे चार हात लांबच असतात.
तडजोड करत नाहीत
या जन्मतारखेचे लोक कोणत्याही गोष्टीचा खूप जास्त विचार करतात. कधीकधी हे लोक फार निराश असतात तर कधी फार प्रसन्न असतात. याचं कारण म्हणजे यांना प्रत्येक गोष्ट यांच्या मनाप्रमाणे हवी असेत. त्यासाठी हे कोणत्याच प्रकारची तडजोड करत नाहीत. प्रत्येक व्यक्ती परफेक्ट नसते यावर यांचा जणू विश्वासच नसतो. याच कारणामुळे अनेक हे लोक इतरांच्या चर्चेचं कारण ठरतात.
आर्थिकदृष्ट्या सक्षम
मूलांक 3 चे लोक हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. हे लोक सतत आपलं भविष्य उज्ज्वल कसं करता येईल याच्या प्रयत्नात असतात. तसेच, मिडिया, लेखक, आयटी क्षेत्र, आणि प्रोफेसरच्या भूमिकेत हे लोक जास्त आढळतात.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
