Numerology Of Mulank 3 : अंकज्योतिष शास्त्रात प्रत्येक अंकाचं विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रानुसार (Ank Shastra), व्यक्तीचा स्वभाव, त्याचं भविष्य तसेच, व्यक्तीच्या आवडी निवडी यांचा अंदाज लावता येतो. या ठिकाणी आपण आज मूलांक 3 (Mulank) च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
कसा असतो स्वभाव?
अंकज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 चा स्वामी ग्रह बृहस्पती आहे. बृहस्पतीला सर्व ग्रहांचा स्वामी असं म्हणतात. त्यानुसार मूलांक 3 असणारे लोक फार स्वाभिमानी असतात. या लोकांना कोणाच्याही पुढे हात पसरायला आवडत नाही. तसेच, या जन्मतारखेच्या लोकांना आपल्या जीवनात कोण्या दुसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप आवडत नाही. तसेच, यांना कोणाचे उपकारही आवडत नाहीत.
अभ्यासात नेहमी हुशार असतात
या जन्मतारखेचे लोक अभ्यासात फार हुशार असतात. अभ्यासात-लिखाणात हे नेहमीच पुढे असतात. तसेच, वर्गात, समाजातसुद्धा यांची ओळख हुशार व्यक्ती म्हणूनच असते. या लोकांना विज्ञान आणि साहित्य यांसारख्या विषयात फार आवड असते. हे लोक फक्त शिक्षणातच नाही तर इतर क्षेत्रातही यश संपादन करतात.
आर्थिक तंगी
या जन्मतारखेचे लोक फार साहसी, वीर, शक्तिशाली, संघर्षशील आणि कधीच हार न मानणारे असतात. मात्र, यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. यांच्या आर्थिक स्थितीत नेहमीच चढ-उतार पाहायला मिळतो. अनेकदा यांना घरातून पैसे मागावे लागतात. मात्र, वयाच्या ठराविक टप्प्यावर यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होते.
वैवाहिक जीवन
या जन्मतारखेच्या लोकांचा आपल्या मित्रपरिवार फार विश्वास असतो. त्यामुळेच हे लोक पटकन धोका खातात. प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, यांच्या लव्ह रिलेशनशिप फारशा टिकत नाहीत. मात्र, यांचं वैवाहिक जीवन फार सुखी असतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :