Numerology Of Mulank 2 : अंकज्योतिष (Ank Shastra) शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या स्वभाव, विचार आणि आयुष्याशी निगडीत असतो. ज्याप्रमाणे राशीनुसार (Zodiac Signs) प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो. त्याचप्रमाणे अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या आवडी निवडी सहज ओळखणं शक्य होतं. आज आपण अशाच एका मूलांकाबाबत (Mulank) जाणून घेणार आहोत. ज्यांना हरवणं केवळ शक्यच नाही तर अशक्य आहे.

Continues below advertisement

अंकशास्त्रानुसार, आज आपण मूलांक 2 च्या संदर्भात जाणून घेणार आहोत. मूलांक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. या मूलांकाचे लोक फार भावनिक आणि समजूतदार स्वभावाचे असतात. या लोकांना नेहमी नातेवाईकांत, मित्रपरिवारात राहायला आवडतं. 

कसा असतो यांचा स्वभाव? 

या जन्मतारखेचे लोक फार कल्पनाशील, भावनिक, दयाळू तसेस समजूतदार स्वाभावाचे असतात. यांना नेहमी आपल्या आजूबाजूला माणसांचा गोतावळा हवा असतो. एकट्यात राहणं यांना आवडत नाही. 

Continues below advertisement

यांना हरवणं केवळ अशक्य..

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा स्वभाव भावनिक आणि समजूतदार असल्यामुळे यांना चांगली नाती निर्माण करता येतात. नाती टिकवता येतात. असे लोक फार मनमिळाऊ स्वभावाचे असतात. यांना टीममध्ये राहून काम करायला आवडतं. इतरांशी यांना सहज जुळवून घेता येतं. तसेच, करिअरच्या बाबतीतही हे लोक फार हुशार असल्या कारणाने यांना नात्यात, करिअरमध्ये हरवणं केवळ अशक्य आहे. 

विनाकारण जोखीम घेत नाहीत 

या जन्मतारखेच्या लोकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे यांना आयुष्यात बदल हवा असतो. पण विनाकारण यांना जोखीम हाती घेणं आवडत नाही. या जन्मतारखेचे लोक स्वभावाने फारच रोमॅंटिक असतात. यांच्या नात्यात खरेपणा असतो. तसेच, इतरांना मदत करणं यांना फार आवडतं. 

हे ही वाचा :                                                                                                    

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Laxmi Narayan Yog : 2026 वर्षातला सर्वात शक्तिशाली योग; लक्ष्मी नारायण योगामुळे 3 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; पैसा, नोकरी, करिअरला चार चॉंद