Numerology Of Mulank 2 : अंकज्योतिष शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याबद्दल अंदाज लावता येतो. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार व्यक्तीची रास ओळखली जाते. त्याचप्रमाणे अंकज्योतिष (Ank Shastra) शास्त्रात जन्मतारखेनुसार व्यक्तीचा मूलांक (Mulank) ठरवला जातो. आज आपण मूलांक 2 च्या लोकांचा स्वभाव कसा असतो आणि त्यांचं वैशिष्ट्य नेमकं काय असतं हे जाणून घेऊयात.  

Continues below advertisement

अंकशास्त्रात, मूलांक 2 ला देखील विशेष महत्त्व आहे. कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यामुळे मूलांक 2 चे लोक फार शांत आणि मूडी स्वभावाचे असतात. हे लोक आपल्याच मनाचे राजे असतात. या मूलांकाची आणखी कोणती वैशिष्ट्य आहेत ते जाणून घेऊयात. 

अंतर्मुख, विचारशील आणि स्वतःच्या विश्वात रमणारे 

मूलांक 2 वर चंद्राचा प्रभाव असतो. हे लोक अंतर्मुख, विचारशील आणि स्वतःच्या विश्वात रमणारे असतात. बाहेरुन शांत वाटणाऱ्या या लोकांच्या मनात मात्र सतत विचारांची गर्दी चालू असते. त्यामुळे अचानक बोलणं बंद करणं, लोकांपासून दूर जाणं किंवा एकटं राहण्याची इच्छा निर्माण होणं हे यांच्यासाठी अगदी स्वाभाविक असतं.

Continues below advertisement

फार मूडी असतात

महत्त्वाचं म्हणजे या जन्मतारखेचे लोक मुद्दाम मूडी वागत नाहीत. मूळातच त्यांचा स्वभावच तसा असतो. भावना दडपून ठेवणं, मनातल्या गोष्टी लगेच न सांगणं हे त्यांचं वैशिष्ट्य असतं.  त्यामुळे नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते.

अंकशास्त्रात असं म्हटलंय की, अशा लोकांनी ध्यान, संगीत, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवला तर मन स्थिर राहतं. तसेच त्यांच्या जवळच्या लोकांनीही त्यांच्या या बदलत्या मूडला समजून घेणं गरजेचं आहे. कारण मूडी असणं हा दोष नसून, ती त्यांच्या संवेदनशील मनाचीच खूण आहे.

हे ही वाचा :                                                                                       

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope Lucky Zodiac : जानेवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात 'या' 5 राशींना मिळणार मोठ्ठी संधी; करिअर, पैसा, नोकरीत मिळतील शुभ संकेत