Numerology : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राचा (Astrology) एक महत्त्वपूर्ण भाग मानला गेला आहे. असे मानले जाते की, ज्याप्रमाणे आपली राशी, कुंडलीमध्ये असलेले ग्रह आणि नक्षत्र आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात, त्याचप्रमाणे आपल्या जन्मतारखेचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो. मूलांक फक्त जन्मतारखेद्वारे काढला जातो. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावाची आणि त्याच्या आयुष्याची माहिती मूलांकाच्या आधारे म्हणजेच त्याच्या जन्मतारखेच्या आधारे केली जाते.



'ही' जन्मतारीख असलेले लोक भाग्यवान मानले जातात
अंकशास्त्रात 1 ते 9 पर्यंतचे अंक सांगितले आहेत. राशीप्रमाणेच सर्व मूलांकांचा संबंध नऊपैकी कोणत्याही एका ग्रहाशी मानला जातो. मूलांकाशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या जीवनावर त्या ग्रहाचा परिणाम नक्कीच होतो. आपल्या जन्मतारखेचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो. मूलांक फक्त जन्मतारखेद्वारे काढला जातो. अंकशास्त्रानुसार, 'ही' जन्मतारीख असलेले लोक भाग्यवान मानले जातात. आयुष्यात ते कोणत्याही क्षेत्रात गेले तरी खूप नाव आणि भरपूर पैसा कमावतात. उदाहरणार्थ, जर तुमचा जन्म 24 तारखेला झाला असेल, तर 2+4= 6 येईल. त्याचप्रमाणे, उर्वरित मूलांक देखील काढले जातात.



शुक्र ग्रहाचे अधिराज्य


-अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तीचा जन्म 6, 15 आणि 24 तारखेला झाला, त्यांचा मूलांक 6 आहे. कोणत्याही महिन्याच्या आणि कोणत्याही वर्षाच्या 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांवर शुक्र ग्रहाचे अधिराज्य असते.



-6 क्रमांकाचे लोक शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि दिसायला सुंदर असतात. या लोकांचे म्हातारपण लवकर येत नाही. हे लोक कलाप्रेमी असतात आणि सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात.



-6 क्रमांकाचे लोक त्यांच्या आयुष्यात खूप नाव आणि प्रसिद्धी कमावतात. मात्र, यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागते.



-अंकशास्त्रानुसार शुक्राच्या कृपेने 6 जन्मतारीख असलेले लोक त्यांच्या आयुष्यात भरपूर पैसा कमावतात. त्यांना आयुष्यात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही. त्यांची अर्थव्यवस्था खूप चांगली असते.



-चित्रपट, नाटक, खाद्यपदार्थ, कपडे आणि दागिन्यांशी संबंधित कामात त्यांना अधिक यश मिळण्याची शक्यता असते.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


इतर बातम्या


Lucky Number : नव्या वर्षात 2023 मध्ये तुमचा लकी नंबर कोणता? कुणाचं भाग्य उजळणार?