Numerology: आजकाल प्रत्येकालाच झटपट श्रीमंत व्हायचंय, त्यासाठी काही लोक विविध पर्यांयांचा वापर करतात. तर काही लोक अत्यंत मेहनत करतात. मात्र काही लोकांचे नशीब असे असते की त्यांना झटपट यश मिळत नाही. तर काही लोकांचं श्रीमंत होणं ठरलेलं असतं, फक्त त्यांची योग्य वेळ येणं गरजेचं असतं. अंकशास्त्रानुसार आज आपण अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना वयाच्या 30 वर्षांमध्ये असा जॅकपॉट लागतो, की ते श्रीमंत होतात. त्यांच्यावर शनिदेवांचा मोठा आशीर्वाद असतो. जाणून घेऊया अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल...

Continues below advertisement


शनिदेवांचा विशेष आशीर्वाद...


अंकशास्त्रानुसार, आज आपण अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल बोलत आहोत, ज्यांचे नशीब वयाच्या तिशीनंतर उजळते. तो अंक आहे 8, ज्यांची जन्मतारीख 8, 17 किंवा 16 आहे, त्यांचा मूलांक 8 मानला जातो. या लोकांवर शनीचा विशेष आशीर्वाद असतो. हे लोक शिस्तप्रिय आणि मेहनती असतात. परंतु 30 वर्षांनंतर त्यांचे नशीब चमकण्याची शक्यता जास्त असते. 


हळूहळू श्रीमंत होऊ लागतात...


अंकशास्त्रानुसार, असे म्हटले जाते की 8 क्रमांकाच्या लोकांना 30 वर्षांच्या वयापर्यंत कठोर परिश्रम करावे लागतात. या काळात शनि त्यांची कठोर परीक्षा घेतो. परंतु 30 ओलांडताच त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळू लागते आणि ते हळूहळू श्रीमंत होऊ लागतात. ज्याप्रमाणे शनि हळूहळू एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्याचप्रमाणे 8 क्रमांकाच्या लोकांनाही यश मिळविण्यासाठी थोडा वेळ लागतो.


एक दिवस नक्कीच यश मिळते..


अंकशास्त्रानुसार, मूलांक 8 च्या लोकांना एक दिवस नक्कीच यश मिळेल हे निश्चित आहे. सहसा या मूलांकाचे लोक त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात खूप संघर्ष करतात, परंतु 30 नंतर त्यांच्या समस्या संपू लागतात. मूलांक 8 चे लोक कोणत्याही कामात घाई करत नाहीत. ते वेळ काढून कोणतेही काम उत्तम प्रकारे करतात. ज्यामुळे त्यांना शेवटी सुवर्ण यश मिळते.


हुशारीने पैसे खर्च करतात..


अंकशास्त्रानुसार, या मूलांकाचे लोक हुशारीने पैसे खर्च करतात. हेच कारण आहे की काही काळानंतर ते चांगले पैसे जमा करतात. 


कर्मावर जास्त विश्वास ठेवतात...


अंकशास्त्रानुसार, मूलांक 8 असलेले लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात, म्हणून ते कामात गुंतलेले राहतात. हेच कारण आहे की त्यांना निश्चितच यश मिळते.


हेही वाचा :           


Weekly Horoscope 25 To 31 August 2025: ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात 'या' 5 राशींचे नशीब सुस्साट! संपूर्ण आठवडा कसा जाणार? मेष ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)