Numerology: आजच्या जगात मोबाईल म्हणजे जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. कारण आज मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला अनेक काम घरबसल्या करणे शक्य झाले आहे. आजकाल बाजारात विविध ब्रॅंड्सचे मोबाईल उपलब्ध आहेत, त्यामुळे कोणता मोबाईल घ्यायचा, यासोबतच मोबाईल नंबरही तितकाच युनिक असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. अंकशास्त्रानुसार पाहायला गेलं तर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या नशिबाशी जोडलेला असतो, असे मानले जाते. अंकशास्त्रज्ञांच्या मते, मोबाईल नंबरच्या शेवटच्या दोन अंकांच्या संयोगाचा व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आज आपण अंकशास्त्रानुसार जाणून घेणार आहोत, की मोबाईल क्रमांकातील कोणत्या अंकाचा शुभ प्रभाव पडतो, किंवा कोणत्या अंकामुळे नकारात्मक परिणाम भोगावा लागतो.. तुमच्या मोबाईल क्रमांकात तर हे अंक नाहीत ना? जाणून घेऊया...
तुमच्या मोबाईल क्रमांकातील 'ही' अंकजोडी सकारात्मक किंवा नकारात्मक? (Mobile Number Numerology)
अंकशास्त्रानुसार, मोबाईल नंबर तुमच्या आयुष्यातील योगायोग दर्शवितो. तुमचा मोबाईल नंबर तुमच्या नशिबाशी जोडलेला असतो, तुमच्या मोबाईल नंबरच्या शेवटच्या दोन अंकांच्या संयोगाचा व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अंकशास्त्रानुसार, तुमच्या मोबाईल क्रमांकातील अंकसंयोग शुभ आहेत आणि कोणते टाळले पाहिजेत.
अंकशास्त्रानुसार, शुभ मानले जाणारे मोबाईल नंबरचे संयोग..
या संयोगांचे मोबाईल नंबर सकारात्मक ऊर्जा आणतात असे मानले जाते.
12,21 - यश आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक19, 91 - कामात यश23, 32 - राजयोग आणि प्रगती29, 92 - धन आणि करिअरमध्ये सामर्थ्य35, 53 - आर्थिक आणि वित्तीय स्थिरता38, 83 - नोकरीत यश57, 75 - व्यवसायात वाढ67, 76 - ऐश्वर्यपूर्ण जीवन69, 96 - व्यवस्थापन आणि नियोजनात यश
अंकशास्त्रानुसार, अशुभ मानले जाणारे अंकांचे संयोजन..
अंकशास्त्र तज्ज्ञांच्या मते, जर मोबाईल नंबरमध्ये असे अंक असतील, तर संयम आणि सावधगिरी बाळगली पाहिजे.
14, 41- अंगदुखी आणि कायदेशीर वाद16, 61, 18, 81 - वैवाहिक तणाव आणि आरोग्याच्या समस्या26, 62, 27, 72 - आरोग्याच्या समस्या34, 43 - आरोग्याच्या समस्या46, 64 - नातेसंबंधांमधील तणाव48, 84 - व्यसनाधीनतेची प्रवृत्ती49, 94 - कायदेशीर वाद ओढावतात68, 86 - आरोग्याच्या गंभीर समस्या89, 98 - वाद आणि भांडण होते.
मोबाईल नंबरचा खरोखरच काही परिणाम होतो का?
अंकशास्त्र हे श्रद्धेवर आधारित शास्त्र आहे. त्याचा प्रभाव व्यक्तीच्या जन्म अंक आणि मूलांकाशी देखील जोडलेला असतो. त्यामुळे, कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी पात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे उचित आहे. योग्य अंक निवडल्याने सकारात्मक बदल घडून येऊ शकतात आणि परिस्थितीत सुधारणा होऊ शकते.
ही वाचा
