Numerology: लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन, हिंदू धर्मात विवाह म्हणजे एक संस्कार मानले जातात. लग्न केल्यानंतर दोन लोक आयुष्यभरासाठी एकमेकांचे जीवनसाथी बनतात. केवळ सुखातच नाही, तर दु:खातही एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. मात्र आजच्या काळात घटस्फोटांचे प्रमाण पाहता आजही अनेक जण लग्न करण्याच्या विरुद्ध आहेत. काही लोकांचा तर यावरून विश्वासच उडाला असल्याचे ऐकण्यास मिळते. तर काही लोकांना आजीवन एकटे राहावेसे वाटते. काही लोक अनेकदा मेहनत करूनही त्यांचे भाग्य उजळत नाही, पण अंकशास्त्राच्या दृष्टीने पाहायला गेलं तर काही जन्मतारखा अशा असतात, ज्यांच्या नशीबाचे दार लग्नानंतरच उघडते. त्यांचा जोडीदार त्यांच्यासाठी भाग्य घेऊन येतो. लग्नानंतर ते प्रसिद्धी आणि पैसा कमावतात. जाणून घेऊया..
'या' जन्मतारखेच्या लोकांचं लग्नानंतर नशीब उजळते!
अंकशास्त्रानुसार, आपल्या जीवनात संख्यांचे खूप विशेष महत्त्व असते. ज्याप्रमाणे राशी आपल्या स्वभावावर आणि भविष्यावर परिणाम करतात, त्याचप्रमाणे जन्मतारीख (जन्म क्रमांक) देखील आपल्या जीवनावर परिणाम करते. कोणत्याही व्यक्तीच्या संख्येवरून स्वभाव, भविष्य, सवयी, करिअर, आरोग्य, वैवाहिक जीवन यासह अनेक गोष्टी जाणून घेता येतात. आज आम्ही तुम्हाला अशा संख्येबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्याशी संबंधित लोकांचा जोडीदार खूप भाग्यवान असल्याचे सिद्ध होते. लग्नानंतर या लोकांचे नशीब चमकते. जाणून घ्या हे कोणत्या जन्मतारखेचे लोक आहेत.
लग्न होताच उत्तम नोकरीच्या ऑफर..
अंकशास्त्रानुसार, आपण ज्या जन्मतारखेच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, तो अंक 7 आहे. ज्यांची जन्मतारीख 7, 16 आणि 25 आहे त्यांचा मूळ क्रमांक म्हणजेच मूलांक 7 असतो. या मूलांकाचे लोक भाग्यवान असतात. लग्नानंतर त्यांचे नशीब चमकते असे म्हटले जाते. अंकशास्त्रानुसार, 7 क्रमांकाच्या लोकांना लग्नानंतरच त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळते. असे म्हटले जाते की त्यांचा जोडीदार त्यांच्यासाठी भाग्यवान ठरतो. त्यामुळे लग्न होताच त्यांना उत्तम नोकरीच्या ऑफर मिळू लागतात.
केतू ग्रहाचा प्रभाव
अंकशास्त्रात, 7 क्रमांकाचे मूळ खूप रहस्यमय, आध्यात्मिक आणि खोल विचारसरणीचे मानले जाते. ही संख्या केतू ग्रहाचा अधिपत्याखाली आहे. अशात, 7 क्रमांकाच्या लोकांच्या प्रेम जीवनाचे आणि लग्नाचे स्वरूप इतर मूलांकांपेक्षा काहीसे वेगळे असते, परंतु ते विशेष असते.
मनापासून प्रेम करतात..
अंकशास्त्रानुसार 7 मूलांकाचे लोक प्रेमात खूप भावनिक असतात, परंतु हे लोक त्यांच्या भावना व्यक्त करण्यास कचरतात. काही वेळेस खूप प्रेम असूनही अनेकदा शांत राहतात.
व्यक्तीला पूर्णपणे समर्पित असतात
अंकशास्त्रानुसार 7 मूलांकाच्या लोकांना एखादी व्यक्ती आवडली की, ते त्या व्यक्तीला पूर्णपणे समर्पित असतात. परंतु ते खूप विचार केल्यानंतर प्रेम करतात. ते घाईघाईने कोणत्याही नात्यात अडकत नाहीत.
लग्नानंतर नशीब कसे बदलते?
अंकशास्त्रज्ञांच्या मते, मूलांक 7 असलेल्या लोकांना लग्नानंतर मानसिक स्थिरता आणि भावनिक संतुलन मिळते.त्यांच्या जोडीदाराचा सहवास त्यांना आत्मविश्वास आणि उर्जेने भरतो, ज्यामुळे त्यांना त्यांच्या करिअर आणि जीवनातील निर्णयांमध्ये वेगाने पुढे जाण्यास मदत होते.लग्नानंतर हे लोक अनेकदा आर्थिकदृष्ट्या मजबूत होतात आणि प्रगतीचा मार्ग स्वीकारतात.
कोणत्या मूलांक असलेले लोक त्यांच्यासाठी भाग्यवान जोडीदार बनतात?
मूलांक 2: भावनिक संबंध आणि सुसंवाद.मूलांक 4: स्थिरता आणि व्यावहारिक विचारसरणी.मूलांक 9: ऊर्जा, धैर्य आणि यश.
हेही वाचा :
Numerology: मागच्या जन्माचं कर्ज या जन्मी फेडतातच, 'या' जन्मतारखेच्या लोकांना कर्मांचं फळ भोगावंच लागतं, यातून सुटका नसते, अंकशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
