Continues below advertisement

Numerology: अंकशास्त्रानुसार (Numerology) पाहायला गेलं तर, कोणत्याही व्यक्तीचा जन्मतारखेवरून त्यांच्या जन्मतारखेचा अंदाज येऊ शकतो. आज 5 नोव्हेंबर रोजी भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचा वाढदिवस (Virat Kohli Birthday) आहे. अंकशास्त्रात जन्मतारखेला विशेष महत्त्व आहे. एखाद्याची जन्मतारीख त्याचे भाग्य, नशीब ठरवू शकते, असे म्हटले जाते. त्याचे गुण आणि कमकुवतपणा त्यांच्या जन्माच्या संख्येवरून ठरवता येतात. तुमचीही जन्मतारीख 5, 14 किंवा 23 असेल तर आज 5 मूलांक असलेल्या लोकांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. काय आहे त्यांच्या यशाचं सीक्रेट?

जन्मतारखेवरून मूलांक कसा काढाल?

अंकशास्त्रात मूलांक सर्वात महत्त्वाचा असतो. जर एखाद्याचा जन्म महिन्याच्या 18 तारखेला झाला असेल तर त्यांची संख्या 1+8 तर त्याचा मूलांक 9 असतो. आज आम्ही तुम्हाला 5 अंक असलेल्या लोकांच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहोत. 5 अंक असलेले लोक कसे असतात, त्यांचे गुण आणि कमकुवतपणा काय असतो? आज विराट कोहलीचा वाढदिवस आहे, त्याच्या जन्मतारखेच्या वैशिष्ट्याबद्दल जाणून घेऊया...

Continues below advertisement

बुध ग्रहाचे वर्चस्व

अंकशास्त्रानुसार, 5 अंक असलेल्या लोकांचा अधिपती ग्रह बुध आहे. बुध हा ज्ञान, बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र आणि व्यवसायाचा ग्रह मानला जातो. 5 अंक असलेल्या लोकांना तीक्ष्ण बुद्धी असल्याचे मानले जाते. क्रिकेटपटू विराट कोहलीचाही 5 हाच मूलांक आहे.

विराट कोहलीचाही हाच मूलांक..

अंकशास्त्रानुसार, जर एखाद्याचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झाला असेल तर त्याचा मूलांक 5 असतो. विराट कोहलीची जन्मतारीख 5 आहे, म्हणून त्याचा मूलांकही 5 आहे. विराट कोहलीचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी नवी दिल्ली येथे झाला. विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत खूप प्रसिद्धी आणि यश मिळवले आहे. 5 या अंकाचे लोक कसे असतात ते जाणून घेऊया.

बोलण्याच्या कौशल्यामुळे लोक पसंत करतात...

अंकशास्त्रानुसार, या लोकांची बोलण्याची क्षमता चांगली असते. त्यांचा स्वभाव खूप चांगला असतो. त्यांच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे लोक त्यांच्या जवळ येतात. ते थोडे जास्त रागीटही असतात. ते खूप बोलके असतात आणि मोकळेपणाने बोलायला आवडतात. त्यांचे कौटुंबिक जीवन देखील चांगले असते. ते नेहमीच त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतात.

करिअर उत्तम

अंकशास्त्रानुसार, 5 या अंकाच्या लोकांनी जनसंपर्क, शिक्षण, पत्रकारिता, ज्योतिष, क्रीडा, वैद्यकशास्त्र, कायदा इत्यादी क्षेत्रात करिअर करावे. या क्षेत्रात करिअर केल्याने त्यांना चांगले यश मिळेल. हे लोक राजकारणातही चांगले पद मिळवू शकतात

भाग्यवान रंग - हिरवा, पांढरा आणि खाकी

भाग्यवान तारखा - 5,14 आणि 23

भाग्यवान दिवस - शुक्रवार, शनिवार आणि बुधवार

भाग्यवान मंत्र - “ओम ब्रम ब्रम ब्रम सह बुधय नमःआणिओम गणपतये नमः

मैत्री क्रमांक - 3, 4, 5, 7 आणि 8

हेही वाचा

Dev Diwali 2025: 1..2 नाही, आज देव दिवाळीला तब्बल 3 पॉवरफुल राजयोग बनले! 4 राशींचं नशीब उजळलं, कोणत्या राशी मालामाल होणार?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)