Numerology: एखादी मुलगी जेव्हा लग्न करून नवऱ्याच्या घरी जाते, तेव्हा प्रत्येक मुलीची इच्छा असते की लग्नानंतर तिचे तिच्या सासरच्या मंडळीसोबत चांगले संबंध असावेत, खास करून नवरा, सासू आणि नणंदेकडून सर्वात जास्त प्रेम आणि आदर मिळावा. घरात येणाऱ्या प्रत्येक सुनेला तिच्या सासू आणि नणंदेशी असलेले नाते अधिक दृढ करायचे असते. यासाठी ती सर्वांशी चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न करते, परंतु बऱ्याचदा असे घडते की खूप प्रयत्न करूनही नाते बिघडते. मात्र या सर्वात या मुलींचे पती तिला खूप आधार आणि प्रेम देतात, अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, नातेसंबंधा त्याच्या जन्मतारखेशी संबंधित असते. अंकशास्त्रानुसार आज आम्ही अशाच काही मुलींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे त्यांच्या पतीसोबत आयुष्य सुंदर असते, परंतु त्यांचे सासू आणि नणंदेसोबत बऱ्याचदा खटके उडतात..
सुना कितीही चांगल्या वागल्या तरी नात्यात संघर्ष असतो...
प्रत्येक मुलगी तिची सासू आणि नणंद सोबत चांगले संबंध ठेवू इच्छिते. परंतु काही मुलींसोबत असे घडते की, त्या कितीही चांगल्या वागल्या तरी नात्यात संघर्ष असतो. अंकशास्त्र असे मानते की एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि नातेसंबंध त्याच्या जन्मतारखेमुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित होतात. आज आपण अशा जन्मतारखेच्या मुलींबद्दल बोलणार आहोत, जे त्यांच्या जोडीदाराच्या हृदयाची राणी असतात, परंतु कुटुंबातील त्यांची सासू आणि नणंदेसोबत असलेले नाते अनेकदा आव्हानात्मक असू शकते. अंकशास्त्रानुसार जाणून घेऊया त्या जन्मतारीख किंवा मूलांकाबद्दल...
सासू, नणंदेसोबत जमत नाही, पण जोडीदाराची पहिली पसंती..!
अंकशास्त्रानुसार आज अशा जन्मतारखेच्या मुलींबद्दल बोलत आहोत. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला असेल, अशा मुलींचा मूलांक क्रमांक 1 असतो. या मुलींवर सूर्य देवाचा प्रभाव असतो जो त्यांना नेतृत्व क्षमता, आत्मविश्वास आणि मजबूत व्यक्तिमत्व देतो.
दृष्टिकोनावर ठाम
अंकशास्त्रानुसार, या मुली नेतृत्ववादी असतात, त्यांच्या दृष्टिकोनावर ठाम असतात. जेव्हा दोन किंवा अधिक मजबूत महिला एकाच घरात असतात तेव्हा विचारांचा संघर्ष होणे स्वाभाविक आहे.
सहजपणे तडजोड करत नाहीत
अंकशास्त्रानुसार,या मुली कोणत्याही गोष्टीवर सहजपणे तडजोड करत नाहीत, विशेषतः जेव्हा त्यांना वाटते की ते बरोबर आहेत. ही वृत्ती कदाचित सासू किंवा नणंदेला आवडणार नाही कारण त्या घरातील परंपरा किंवा जुन्या नियमांना जास्त महत्त्व देतात.
स्वतंत्र विचारसरणी
अंकशास्त्रानुसार, या मुली 1 क्रमांकाच्या मुलींना कोणाच्याही अधीन राहणे आवडत नाही. त्यांना त्यांच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप आवडत नाही, ज्यामुळे सासूला असे वाटू शकते की त्या तिचे ऐकत नाहीत.
स्पष्टवक्ता
अंकशास्त्रानुसार, या मुली स्पष्टवक्ता असतात, जे काही असते, ते तोंडावर सरळ बोलतात. कधीकधी त्यांच्या सरळपणामुळे गैरसमज किंवा राग येऊ शकतो.
हेही वाचा :
Numerology: मागच्या जन्माचं कर्ज या जन्मी फेडतातच, 'या' जन्मतारखेच्या लोकांना कर्मांचं फळ भोगावंच लागतं, यातून सुटका नसते, अंकशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)