Numerology: ते म्हणतात ना, आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही.. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.. आई-मुलाचे नाते हे जगातील सर्वात खास नाते आहे. मुलाचा जन्म झाल्यानंतर एका महिलेचे जीवन पूर्णपणे बदलून जाते. आई आपल्या मुलाच्या अगदी छोट्या गरजा देखील पूर्ण करते. ती त्याला प्रत्येक परिस्थितीत साथ देते. आई मुलाला इतके सक्षम बनवते की, मुलगा प्रत्येक परिस्थितीला उघडपणे तोंड देऊ शकतो. अनेक वेळा मुलं मोठी झाली की, त्यांच्या पालकांना त्यांच्या म्हातारपणात प्रेम देऊ शकत नाहीत. काही मुलं स्वतःच्या स्वार्थापोटी पालकांच्या आनंदाकडे दुर्लक्ष करतात. त्याच वेळी, काही मुलं अशी असतात, जी अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांच्या आईला एकटं सोडत नाहीत. ही मुलं आपल्या आईला नेहमीच पाठिंबा देतात आणि त्यांना खूप प्रेम देतात.

या जन्मतारखेची मुलं 'मम्माज बॉय' असतात..

मूल होणे हे पालकांसाठी आशीर्वाद आहे. प्रत्येक मूल पालकांसाठी भाग्यवान असते, मग ती मुलगी असो वा मुलगा. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 2, 3, 6, 8, 12, 15, 20, 26, 28 आणि 30 तारखेला जन्मलेली मुले त्यांच्या आईला आयुष्यभर साथ देतात. ते त्यांना कोणत्याही परिस्थितीत एकटे सोडत नाहीत. ते त्यांना खूप प्रेम आणि पाठिंबा देतात, घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतात. अंकशास्त्रानुसार, अशा काही तारखा आहेत, ज्या जन्मतारखेची मुलं त्यांच्या आईसाठी सपोर्ट सिस्टीम असतात. ही मुलं आपल्या आईला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. अंकशास्त्रानुसार, जाणून घेऊया कोणत्या तारखेला जन्मलेली मुले 'मम्माज बॉय' मानली जातात.

हे लोक स्वबळावर यश मिळवतात!

अंकानुसार असे म्हटले जाते की, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 8, 17, 19 आणि 26 तारखेला होतो ते जीवनात उच्च स्थान प्राप्त करतात. पण या लोकांना कधीच कोणाकडून विशेष मदत मिळत नाही. त्यांच्याकडे कोणतीही सपोर्ट सिस्टिम नसतो. हे लोक त्यांच्या कारकिर्दीत स्वतःहून उच्च पदे मिळवतात.

हेही वाचा..

Weekly Horoscope 14 To 20 April 2025: एप्रिलचा तिसरा आठवडा 'या' 4 राशींचे नशीब पालटणा14रा! नोकरीत पगारवाढ, करिअर जोरात? 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)