Numerology: ज्याप्रमाणे सूर्योदयानंतर सुर्याचा अस्त होतो, त्याचप्रमाणे सुर्यास्तानंतर सुर्योदयही होतोच की.., तसा सृष्टीचाच नियम आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख-दु:खाचा समतोल असतो. काही लोक आपल्या बुद्धिमत्तेने आणि सामर्थ्याने आपल्या समस्या सोडवतात, तर काही लोक ज्योतिष उपायांचा आधार घेऊन आपले जीवन यशस्वी करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, जीवनाशी संबंधित सर्व समस्यांचे उपाय शास्त्रात सांगितले आहेत. समस्या सोडवण्याबरोबरच अंकशास्त्राच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भविष्याबद्दल देखील माहिती मिळू शकते. आज अंकशास्त्राच्या मदतीने आम्ही तुम्हाला अशा जन्मतारखांबद्दल सांगणार आहोत, ज्या दिवशी जन्मलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अचानक अडचणी येतात. आयुष्यात सतत येणाऱ्या समस्यांमुळे हे लोक रोजच वादात सापडतात.


आयुष्यात अचानक अडचणी येतात..


अंकशास्त्राच्या मदतीने आम्ही तुम्हाला त्या तारखांबद्दल सांगणार आहोत काही जन्मतारखेच्या व्यक्तीच्या आयुष्यात अचानक अडचणी येतात, ज्यामुळे हे लोक नेहमीच वादात राहतात. कठीण काळात देखील त्यांना आर्थिक नुकसानासोबतच टीकेला सामोरे जावे लागते.


संकटे या लोकांना कधीच सोडत नाहीत!


अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31, 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचे मन शुद्ध असते. पण जेव्हा त्यांच्या आयुष्यात सर्वकाही सामान्यपणे चालू असते, तेव्हा अचानक त्यांच्यासमोर काही समस्या निर्माण होतात. एका छोट्याशा समस्येमुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य वादांनी वेढले जाते. काही लोकांना पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागतो, तर काही लोक त्यांच्या बिघडत चाललेल्या नात्यांमुळे त्रस्त राहतात. याशिवाय समाजात व्यक्तीचे नावही खराब होते. त्यांना खूप टीकेला सामोरे जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.






यशासाठी नेहमी तळमळत राहतात!


अंकशास्त्रात असे म्हटले आहे की कोणत्याही महिन्याच्या 2, 4, 7, 8, 11, 13, 16, 17, 20, 22, 25, 26 आणि 29 तारखेला जन्मलेले लोक खूप विचार करतात. हे लोक आपला सगळा वेळ विचारात घालवतात, त्यामुळे त्यांना आयुष्यात कधीच यश मिळत नाही. याशिवाय हे लोक घाईत चुकीचे निर्णय घेतात आणि लोकांच्या बोलण्यावर लगेच मोहतात, ज्याचा त्यांना आयुष्यभर पश्चाताप होतो.


हेही वाचा>>


Lucky Zodiac Sign: 19 मार्च तारीख भाग्याची! 'या' 5 राशींचं होणार चांगभलं, सोन्याचे दिवस येणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)