Numerology: ते म्हणतात ना, प्रेम म्हणजे प्रेम असतं..तुमचं आमचं सेम असतं.. एखादा व्यक्ती प्रेमात पडला, तर त्याचे एक वेगळे जग तयार होते. ज्यामध्ये तो आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीसोबत भरभरून जगत असतो. या नात्याला नाव देण्यासाठी लग्नाचे स्वप्न पाहतो, आणि प्रत्यक्षात ते साकारण्याचा प्रयत्न करतो. अंकशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, काही जन्मतारखेचे लोक हे प्रेमविवाहच करतात. खरं तर त्यासाठी तुमची जन्मतारीख खूप महत्वाची असते, ती व्यक्तीच्या लग्नाशी देखील खोलवर जोडलेली असते. अंकशास्त्रानुसार, जाणून घेऊया..

या जन्मतारखेचे लोक त्यांचे प्रेम लग्नाच्या टप्प्यावर घेऊन जातात.

विवाह हे एक पवित्र बंधन आहे. लग्नाच्या बाबतीत, लोक प्रेमविवाहावर अधिक भर देतात. प्रत्येकजण प्रेमविवाह करू शकत नाही. बहुतेक लोक अरेंज्ड मॅरेजऐवजी बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडसोबत प्रेमविवाह करणे पसंत करतात, परंतु अनेक वेळा असे घडते की, लोक इच्छा असूनही प्रेमविवाह करू शकत नाहीत. अंकशास्त्रानुसार, आज आपण जाणून घेऊया की, प्रेमविवाह करणारे ते चार लोक कोण आहेत, म्हणजेच कोणत्या संख्येचे लोक त्यांचे प्रेम लग्नाच्या टप्प्यावर घेऊन जातात.

प्रेमविवाहासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात...

अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेचे लोक आहेत, जे शक्यतो प्रेमविवाहच करतात, हे लोक स्वतंत्र, संवेदनशील आणि काही प्रमाणात हट्टी देखील असू शकतात, जे प्रेमविवाहासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. अंकशास्त्रानुसार, जाणून घेऊया...

अंकशास्त्रानुसार, काही जन्मतारखेचे लोक प्रेमविवाहात रूपांतरित करण्यात आघाडीवर असतात. त्यांच्यासाठी प्रेमविवाहाची शक्यता खूप जास्त असते. हे मूलांक क्रमांक आहेत - 3, 5, 6 आणि 9. या मूलांक क्रमांक असलेल्या लोकांबद्दल जाणून घ्या.

मूलांक 3: कोणत्याही महिन्याच्या 3, 12 किंवा 21 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. हे लोक स्वभावाने मनमिळावू आणि बोलके असतात. कोणालाही आकर्षित करण्याची क्षमता असलेले हे लोक प्रेमात पडल्यानंतर त्यांच्या प्रियकर किंवा प्रेयसीला त्यांचा जीवनसाथी बनवतात. हे लोक अनेकदा प्रेमविवाह करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

मूलांक 5: कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. हे लोक स्वातंत्र्याने जीवन जगतात आणि स्वभावाने रोमँटिक असतात. हे लोक अनेकदा प्रेमसंबंधांना लग्नापर्यंत घेऊन जातात.

मूलांक 6: कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक मूलांक 6 असतात आणि हे लोक त्यांच्या प्रेमाबद्दल संवेदनशील असतात. प्रेमात बुडालेले हे लोक नात्याशी पूर्णपणे भावनिकरित्या जोडलेले असतात. ज्या लोकांचे त्यांच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडशी खूप खोल भावनिक नाते असते ते प्रेमात पडल्यानंतर नक्कीच लग्न करतात.

मूलांक 9: कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेले लोक मूलांक 9 असतात. अंकशास्त्रानुसार, हे लोक स्वभावाने हट्टी असू शकतात आणि सामाजिक रीतिरिवाजांना आव्हान देऊ शकतात आणि कोणत्याही किंमतीत त्यांचे प्रेम लग्नाच्या गंतव्यस्थानावर घेऊन जाऊ शकतात.

हेही वाचा :                          

Numerology: म्हणूनच 'या' जन्मतारखेच्या लोकांना एकमेकांशी लग्न न करण्याचा सल्ला देतात? कट्टर शत्रू बनतात? अंकशास्त्रात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)