Numerology: अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्राचाच एक भाग समजला जातो. अंकशास्त्राच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव जाणून घेता येतो. जन्मतारीख म्हणजेच मूलांकाच्या मदतीने माणसाचा स्वभाव, करिअर, आर्थिक स्थिती आणि आरोग्य इत्यादींशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेता येतात. याच अंकशास्त्राच्या मदतीने आज तुम्हाला अशा जन्मतारखेच्या मुलींबद्दल सांगणार आहोत, ज्या मुली धाडसी आणि निडर असतात. या मुलींना खोटं अजिबात सहन होत नाही, त्या प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जातात. जाणून घेऊया..

'या' जन्मतारखेच्या मुलींकडे चुकीला माफी नसते..

आपण अनेकदा पाहतो, काही मुली काहीही न बोलता सर्वकाही सहज सहन करतात, तर काही चुकीच्या विरोधात आवाज उठवतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा जन्मतारखांबद्दल सांगणार आहोत, ज्या दिवशी जन्मलेल्या मुली शूर आणि निडर मानल्या जातात. या मुली चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवतात आणि ते कधीही सहन करत नाहीत. ज्यांच्याकडे चुकीला माफी नसते.

कोणत्या मुलींसोबत पंगा घेऊ नये?

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 1, 4, 8, 9, 10, 13, 17, 18, 19, 22, 26, 27, 28 आणि 31 तारखेला जन्मलेल्या मुली धाडसी असतात. ते कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाहीत आणि धैर्याने सामोरे जातात. जर कोणी त्यांच्यावर अन्याय केला तर ते चोख प्रत्युत्तर देतात. याशिवाय, त्या खोटं बोलत नाही आणि ते सहन करू शकत नाही.

'या' जन्मतारखेच्या लोकांना कधीही दुखवू नये...

वैदिक अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचे मन साफ असते. हे लोक खोटे बोलत नाहीत आणि खोटे बोलणे सहन करत नाहीत. जर कोणी त्यांचा विश्वासघात केला तर ते कधीही विसरू शकत नाहीत. त्यामुळे या लोकांना कधीही दुखवू नये.

हेही वाचा>>

Shani Transit 2025: उरले 3 दिवस! तब्बल 30 वर्षांनी 'या' 4 राशींचा होणार भाग्योदय! शनिचा मीन राशीत प्रवेश, राजासारखं जीवन जगणार..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)