Numerology: आजकालच्या बदलत्या जीवनशैलीनुसार, आजच्या मुलीही कशाच्या बाबतीत कमी नाही, त्या देखील यशाच्या शर्यतीत मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. पण काही मुली अशा आहेत, जे त्यांच्या यशात लग्न म्हणजे एक अडथळा मानतात. काही मुलींना वाटतं की, लग्नानंतर त्यांना स्वातंत्र्य मिळणार नाही. कुठेतरी जायचे आहे, काहीतरी खास खरेदी करायचे आहे, काहीतरी ऑर्डर करायचे आहे. या सर्व गोष्टींसाठी त्यांना पती किंवा सासरच्या लोकांवर अवलंबून राहावे लागेल. मात्र अंकशास्त्रानुसार काही मुलींचे नशीब हे लग्नानंतरच चमकते. काही विशेष जन्मतारखेच्या मुली सासरी राणीसारखं जीवन जगतात, भोलेनाथसारखा पती, मायाळू सासू मिळते, जाणून घ्या..
जन्मतारखेवरून समजते भविष्य
ज्याप्रमाणे जन्मकुंडली पाहून व्यक्तीचे व्यक्तिमत्व, भविष्य, आरोग्य आणि आर्थिक स्थिती जाणून घेता येते. त्याचप्रमाणे अंकशास्त्रात एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख पाहून त्याचे गुण आणि अवगुण जाणून घेता येतात. अंकशास्त्राच्या मदतीने जाणून घेऊया लग्नानंतर कोणत्या जन्मतारखांना जन्मलेल्या मुलींचे नशीब चमकते.
लग्नानंतर कोणत्या मुलींचे नशीब चमकते?
अंकशास्त्रानुसार लग्नानंतर कोणत्याही महिन्याच्या 1, 4, 5, 6, 8, 13, 14, 16, 18, 19, 22, 23, 26 आणि 28 तारखेला जन्मलेल्या मुलींचे भाग्य उजळते. या मुली लग्नानंतर आलिशान जीवन जगतात. त्यांना ना पैशाची कमतरता भासत नाही ना त्यांना आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागते. ती तिच्या सासरच्या घरी राणीसारखी राहते. तिला तिच्या पतीकडून नक्कीच पूर्ण प्रेम मिळते. शिवाय, ती तिच्या सासूचीही प्रिय आहे.
प्रेमात अनेकदा होते फसवणूक!
अंकशास्त्र सांगते की 2, 4, 6, 8, 11, 13, 15, 17, 20, 22, 24, 27, 29 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांची प्रेमात फसवणूक होते. हे लोक मनाने शुद्ध असतात आणि आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. पण शेवटी त्यांच्या पदरी निराशाच पडते. या लोकांना जोडीदारासोबत अधिक प्रेम हवे असते.
हेही वाचा>>
Numerology: शक्यतो आई-वडिलांच्या पसंतीनुसार लग्न करतात, 'या' जन्मतारखेच्या लोकांना प्रेमात पुढाकार घ्यायला आवडत नाही, अंकशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
