Numerology: या जगात विविध प्रकाराची, विविध स्वभावाचे लोक आढळतात. काही लोकांचा स्वभाव प्रेमळ, काहींचा रागीट तर काहींचा संशयी..अशात अशीही अनेक लोक असतात. जे त्यांच्या नात्यात यशस्वी होत नाहीत. किंवा त्यांना त्यांच्या जोडीदाराचा स्वभाव पटत नाही. त्यामुळे एकतर ते विवाहबाह्य संबंधाकडे वळतात, किंवा दुसऱ्यांदा नात्यात अडकण्याचा प्रयत्न करतात. अंकशास्त्रानुसार पाहायला गेल्यास, प्रत्येक संख्येचे स्वतःचे महत्त्व असते. ज्यावरून तुम्ही कोणत्याही संख्येच्या लोकांचा स्वभाव आणि भविष्याचा अंदाज लावू शकता. 

या जन्मतारखेच्या लोकांचा स्वभाव इतरांची मन जिंकतो

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. तसेच, त्यांचे तीक्ष्ण मन, आकर्षक व्यक्तिमत्व आणि निर्भय स्वभाव इतरांची मने जिंकतो. या संख्येचे लोक त्यांच्या स्वतःच्या शैलीत राहतात. हे लोक लवकर इतरांमध्ये मिसळतात.

फ्लर्टिंग स्वभावासाठी ओळखले जातात?

अंकशास्त्रानुसार, 5 मूलांकाचे हे लोक कोणाशीही खूप लवकर जुळवून घेतात आणि बहुतेकदा त्यांच्या फ्लर्टिंग स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांचा स्वभाव रोमँटिक असतो आणि बर्‍याचदा ते अतिरिक्त संबंधांकडे आकर्षित होऊ शकतात.

दोनदा लग्न होण्याची शक्यता

अंकशास्त्रानुसार, 5 मूलांकाचे हे लोक स्वतंत्र विचार करणारे असल्याने, त्यांच्या पहिल्या लग्नात अनेक वेळा समस्या उद्भवतात, ज्यामुळे त्यांचे दुसरे लग्न होण्याची शक्यता असते.

लवकर बंधनात अडकायचे नसते..

अंकशास्त्रानुसार, 5 मूलांकाच्या लोकांना लवकर बंधनात अडकायचे नसते आणि जरी त्यांचे लग्न झाले तरी स्थिरता राखणे कठीण होऊ शकते. त्यांना स्वातंत्र्य आवडते, म्हणून ते नात्यात जागा मागतात.

कोणत्या लोकांशी चांगले जुळते?

अंकशास्त्रानुसार, 1, 3 आणि 6 क्रमांकाचे लोक त्यांच्यासाठी चांगले जीवनसाथी ठरू शकतात. 2 आणि 7 क्रमांकाच्या लोकांशी विचार जुळत नाहीत, ज्यामुळे नात्यात संघर्ष होऊ शकतो.

लोकांवर प्रभाव पाडण्यात पटाईत

अंकशास्त्रानुसार, ते चांगले व्यापारी बनतात कारण ते जोखीम घेण्यास आणि लोकांवर प्रभाव पाडण्यात पटाईत असतात. ते मार्केटिंग, मीडिया, सेल्स आणि पत्रकारितेत चांगले करिअर करतात.

मर्यादित पद्धतीने काम करायला आवडत नाही..

अंकशास्त्रानुसार, त्यांना फ्रीलान्सिंग आणि प्रवासाच्या नोकऱ्या आवडतात. त्यांना मर्यादित पद्धतीने काम करायला आवडत नाही

आरोग्य आणि कमकुवतपणा

अंकशास्त्रानुसार, या लोकांना लवकर मानसिक ताण येऊ शकतो. जास्त विचार केल्याने त्यांचा मेंदू लवकर थकू शकतो. खाण्यापिण्याच्या सवयी आणि दैनंदिन दिनचर्येत अनियमितता ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. बुधाच्या प्रभावामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा :                          

Numerology: कितीही प्रयत्न करा, 'या' जन्मतारखेच्या लोकांचं 30 वयाच्या आधी लग्न होतच नाही! शनिदेवांचा हस्तक्षेप कारणीभूत? अंकशास्त्रात म्हटलंय.. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)