Numerology: आपल्या आजूबाजूला आपण विविध स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाची लोक पाहतो. काही लोक खूपचं हळवे असतात. काही लोक सामर्थ्यवान, कशालाही न घाबरणारे असतात, तर काही लोक अगदीच भित्रे.. पण तुम्हाला माहितीय का? व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा स्वभाव, भविष्य पाहता येणे शक्य होते, अंकशास्त्रात, प्रत्येक संख्येचे स्वतःचे महत्त्व आहे. ज्याच्या आधारे माणसाच्या आयुष्यातील विविध प्रसंग समोर येतात. अंकशास्त्रानुसार आज आम्ही तुम्हाला अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल सांगणार आहोत. जे लोक खूप प्रभावशाली आणि आत्मविश्वासी असतात. पैशानेही श्रीमंत असतात, मात्र प्रेमाच्या बाबतीत नेहमी मार खातात. त्यांचे प्रेमसंबंध बऱ्याचदा टिकत नाही, अंकशास्त्रानुसार जाणून घेऊया अशाच एका जन्मतारीख आणि मूलांकाबद्दल...

Continues below advertisement

जर तुमचा जन्म 'या' तारखेला झाला असेल तर...

अंकशास्त्रानुसार, जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झाला असेल तर तुमची मूलांक संख्या 7 होईल. मूलांकाच्या आधारे आपण स्वतःशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती मिळवू शकतो. आज आम्ही तुम्हाला 7 अंकाच्या लोकांचे स्वभाव, वैशिष्ट्य, आवडी-निवडी याबद्दल सविस्तर माहिती देत आहोत. जरी या मूलांक संख्या असलेल्या लोकांचा शासक ग्रह 7 आहे, परंतु काही विद्वान नेपच्यून आणि चंद्र देखील 7 चे अधिपती ग्रह मानतात.

कधीही शांत बसत नाहीत..

अंकशास्त्रानुसार, या मूलांकाचे लोक एका ठिकाणी राहत नाहीत. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा विचार करत असतात. त्यांना जीवनातील बदल आवडतात. या मूलांकाचे लोक खूप प्रभावशाली आणि नेहमी आत्मविश्वासाने भरलेले असतात. त्यांना त्यांचे विचार मोकळेपणाने आणि स्पष्ट मनाने मांडायला आवडतात. अनेकदा त्यांची अतिविचार करण्याची सवय त्यांच्यासाठी अडचणीचे कारण बनते.

Continues below advertisement

7 क्रमांकाचे काही लोक स्वार्थी मानले जातात

अंकशास्त्रानुसार, 7 क्रमांकाचे काही लोक स्वार्थी असतात असे म्हटले जाते. असे मानले जाते की ते स्वतःबद्दल अधिक विचार करतात. त्यांचे कोणतेही काम त्यांच्या म्हणण्यानुसार झाले नाही तर त्यांना खूप लवकर राग येतो आणि चिडचिड होऊ लागते. अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरही ते राईचा पर्वत बनवतात. ते स्वतःमध्येच हरवलेले राहतात, म्हणजेच आनंदी राहण्यासाठी त्यांना कुणाच्याही साथीची गरज नसते. यामुळेच ते फारसे मित्र बनवत नाहीत.

प्रेमात यशस्वी होत नाहीत

अंकशास्त्रानुसार, या मूलांकाचे लोक प्रेमाच्या बाबतीत कमी भाग्यवान असतात. त्यांना त्यांच्या भावना उघडपणे मांडता येत नाहीत. ते नातेसंबंधात असले तरी त्यांच्या रोमँटिक जीवनात अस्थिरता असते. त्यांना कोणत्याही गोष्टीचा खूप लवकर कंटाळा येऊ लागतो, ज्याचा त्यांच्या नात्यावरही वाईट परिणाम होतो.

दिखावा आवडत नाही

अंकशास्त्रानुसार, 7 क्रमांकाच्या लोकांना शो ऑफ म्हणजेच दिखाला करायला अजिबात आवडत नाही. ते जास्त हसणे आणि विनोद करणे देखील टाळतात. त्यांना प्रत्येक काम त्यांच्या मर्यादेत करायला आवडते आणि त्यांना इतरांचा अवाजवी हस्तक्षेपही आवडत नाही. त्यांना माणसांनी वेढून राहण्यापेक्षा एकांतात राहायला आवडतं.

पैशाच्या बाबतीत भाग्यवान

अंकशास्त्रानुसार, 7 क्रमांकाच्या लोकांचे जीवन सुख-सुविधांनी भरलेले असते. ते त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि मेहनतीमुळे चांगले पैसे कमवण्यात यशस्वी होतात. पैशाचा योग्य वापर कसा करायचा हेही त्यांना माहीत आहे. इतरांना प्रभावित करण्यासाठी त्यांना जास्त खर्च करणे आवडत नाही. शिवाय, ते त्यांचे आर्थिक निर्णयही अतिशय हुशारीने घेतात.

हे 3 दिवस अतिशय शुभ

अंकशास्त्रानुसार, या मूलांकाच्या लोकांसाठी रविवार, सोमवार आणि गुरुवार खूप चांगले दिवस मानले जातात. अशा स्थितीत या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले तर सर्व काही शुभ होते.

7 क्रमांकाच्या लोकांसाठी शुभ रंग आणि शुभ तारीख

7, 16 आणि 25 त्यांच्यासाठी खूप भाग्यवान आहेत. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी तुम्ही या तारखा निवडल्यास, तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू शकतात.

जर आपण रंगांबद्दल बोललो तर, 7 क्रमांकाच्या लोकांसाठी हलका पिवळा रंग खूप भाग्यवान आहे.

हेही वाचा>>>

Numerology: अनेकदा मनावर ताबा ठेवू शकत नाहीत! 'या' जन्मतारखेच्या लोकांचं प्रेम बनतं जगासाठी उदाहरण! अंकशास्त्रात म्हटलंय.. 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )