Numerology: या जगात आपल्याला विविध स्वभाव आणि विचारांचे लोक आढळतात, काही लोक शांत, काही अगदी आनंदी तर काही छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावतात. अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख त्याचा स्वभाव, करिअरपासून ते प्रेम जीवनापर्यंत भविष्याचा अंदाज लावू शकते. अंकशास्त्रानुसार, आज आपण अशा जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत, जे प्रचंड प्रतिभावान असतात. मात्र अनेकदा क्षुल्लक गोष्टींवरून रागावतात. ज्यामुळे त्यांचे काम बऱ्याचदा बिघडते. ज्यांच्यावर मंगळाचे वर्चस्व असते, अंकशास्त्रानुसार जाणून घेऊया त्या जन्मतारखांबद्दल, जे लोक कधीच कोणापुढे झुकत नाही, ते त्यांचं म्हणणं खरं करतात..

Continues below advertisement

'या' जन्मतारखांवर मंगळाचे वर्चस्व..अत्यंत रागीष्ट...

अंकशास्त्रानुसार, असे मानले जाते की महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो. हा अंक मंगळ ग्रहाशी संबंधित आहे, म्हणजेच मंगळ हा अंक 9 चा अधिपती ग्रह आहे. अंकशास्त्रानुसार, 9 हा अंक पृथ्वीचा पुत्र म्हटल्या जाणाऱ्या मंगळ देवतेशी संबंधित आहे, जो ऊर्जा, धैर्य आणि शौर्याचे प्रतीक आहे. या अंकाचे लोक तुम्हाला अनेकदा हे गुण दाखवतात. त्याच्या प्रभावाखाली, मूलांक 9 असलेले लोक ऊर्जा आणि धैर्याने परिपूर्ण असतात. असे लोक खूप उत्साही असतात आणि अनेकदा क्षुल्लक गोष्टींवरून रागावतात. 

उद्दिष्ट साध्य होईपर्यंत स्वस्थ बसत नाहीत

अंकशास्त्रानुसार, 9 मूलांकाचे लोक खूप उत्कट असतात. एकदा त्यांनी काही करायचे ठरवले की, ते साध्य होईपर्यंत स्वस्थ बसत नाहीत. कधीकधी ते उत्साह, हट्टीपणा किंवा रागाच्या भरात आपल्या सर्वात मौल्यवान वस्तू सहजपणे देऊन टाकतात. बऱ्याचदा या जन्मतारखेच्या काही लोकांना त्यांना स्वतःच्या प्रतिष्ठेची आणि लौकिकाची पर्वा नसते. 

Continues below advertisement

यश मिळेपर्यंत कधीही हार मानत नाहीत...

अंकशास्त्रानुसार, मूलांक 9 असलेल्या लोकांमध्ये उत्तम नेतृत्व कौशल्ये देखील असतात. ते प्रत्येक कठीण परिस्थितीला न घाबरता सामोरे जातात. मूलांक 9 असलेले लोक स्वभावाने निर्भय आणि मेहनती देखील असतात. शिवाय, या अंकाचे लोक यश मिळेपर्यंत कधीही हार मानत नाहीत. ते निर्णय घेण्यात उत्कृष्ट असतात. त्यांच्या करिअरच्या बाबतीत, ते लष्कर, पोलीस, अभियांत्रिकी, प्रशासकीय सेवा, कायदा व सुव्यवस्था, समाजसेवा आणि बँकिंग यांसारख्या क्षेत्रांसाठी योग्य मानले जातात.

दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला आवडत नाही....

अंकशास्त्रानुसार, 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींवर अनेकदा मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो आणि ते कधीही इतरांवर अवलंबून राहत नाहीत, ते आपल्या मान-सन्मानाशी कधीही तडजोड करत नाहीत. स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करतात. अशा व्यक्ती दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्याऐवजी स्वतंत्रपणे काम करणे पसंत करतात. मूलांक 9 असलेल्या व्यक्ती शिस्तप्रिय असतात आणि हाती घेतलेले कोणतेही काम पूर्ण करण्याचा दृढनिश्चय करतात. कोणताही अडथळा त्यांना त्यांच्या ध्येयांपासून परावृत्त करू शकत नाही.

रागामुळे सर्व काही गमावून बसतात..

अंकशास्त्रानुसार, राग, अतिउत्साह आणि हट्टीपणा हे अंक 9 असलेल्या व्यक्तींचे सर्वात मोठे दोष आहेत. या व्यक्ती अनेकदा रागामुळे किंवा त्यांच्या गर्वामुळे इतरांशी भांडतात. अंक 9 असलेल्या व्यक्तींसाठी, धाडसीपणा अनेकदा तोट्याचा ठरतो. अशा व्यक्ती अनेकदा गैरसमजांना बळी पडतात आणि प्रेमात अनेकदा त्यांचा विश्वासघात होतो.

ही वाचा

Weekly Horoscope: एप्रिलचा तिसरा आठवडा 7 राशींसाठी गेमचेंजर! अमावस्या, अक्षय तृतीयाचा पॉवरफुल इम्पॅक्ट, कोणाची लॉटरी? कोणाचं नुकसान? साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)