Numerology: लग्नासाठी 'या' तारखा म्हणजे जणू पायावर धोंडाच! कितीही प्रेमाने संसार करा, वैवाहिक जीवन उद्धवस्त होतेच, अंकशास्त्र
Numerology: अंकशास्त्रानुसार या तारखेला लग्न केल्याने अनेक त्रास होऊ शकतात. कारण, वैवाहिक जीवनात संख्यांना खूप महत्त्व असते.

Numerology: हिंदू धर्मात लग्नाला खूप मोठे महत्त्व आहे. लग्न म्हणजे दोन व्यक्तींमध्ये शारीरिक आणि आध्यात्मिक संबंध निर्माण होणे. लग्नानुसार, पती-पत्नीमध्ये अनेक जन्मांचे नाते असते आणि ते एका पवित्र बंधनात बांधलेले असतात. लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन, या दोघांचा संसाररुपी गाडा चालवण्यासाठी दोघांचा एकमेकांवर विश्वास आणि आयुष्यभर साथ हवी, अंकशास्त्रानुसार जर पाहायला गेलं, तर वैवाहिक जीवनात काही कलह असेल तर त्याचे एक कारण लग्न कोणत्या तारखेला झाले यावर देखील अवलंबून असते. जर आपण व्यक्तीच्या मूलांकाबद्दल बोललो तर त्याच्या लग्नाची तारीख त्याच्या मूलांकावरून कळू शकते. यासोबतच, भविष्यात त्याचे वैवाहिक जीवन कसे असेल हे देखील आपल्याला कळू शकते. अंकशास्त्रात लग्नाची तारीख व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावर कसा परिणाम करते हे सविस्तर जाणून घेऊया...
वैवाहिक जीवनात संख्यांना खूप महत्त्व
अंकशास्त्रानुसार काही तारखा अशा आहेत, ज्या दिवशी लग्न केल्याने अनेक त्रास होऊ शकतात. अंकशास्त्रानुसार, वैवाहिक जीवनात संख्यांना खूप महत्त्व असते. लग्नाची तारीख आणि वेळ व्यक्तीच्या जीवनावर खूप प्रभाव पाडते. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मूलांक 1 आणि 2 चे वैवाहिक जीवन
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा विवाह 2, 11, 20 आणि 29 तारखेला होतो त्यांच्या वैवाहिक जीवनात मूलांक 1 आणि 2 असतो. अशा लोकांच्या वैवाहिक जीवनात अनेकदा चढ-उतार येतात.
मूलांक 3 चे वैवाहिक जीवन
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा विवाह 3, 30, 12 आणि 21 तारखेला होतो त्यांच्या वैवाहिक जीवनात मूलांक 3 असतो. या लोकांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असते. तसेच, त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून खूप प्रेम मिळते.
मूलांक 4 आणि 5 चे वैवाहिक जीवन
अंकशास्त्रानुसार, 4, 12, 22 आणि 31 तारखेला लग्न करणाऱ्या लोकांचे मूलांक 4 आणि 5 असते. मूलांक 4 असलेल्या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असते, तर मूलांक 5 असलेल्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अनेकदा संघर्ष दिसून येतो.
मूलांक 5 आणि 7 चे वैवाहिक जीवन
अंकशास्त्रानुसार, 6, 15 आणि 24 तारखेला लग्न करणाऱ्या लोकांचे मूलांक 6 असते. त्यांचे वैवाहिक जीवन चांगले असते. दुसरीकडे, 7, 16 आणि 25 तारखेला लग्न करणाऱ्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात त्यांच्या जोडीदाराकडून खूप प्रेम मिळते.
मूलांक 8 आणि 9 चे वैवाहिक जीवन
अंकशास्त्रानुसार, 8, 17 आणि 26 तारखेला लग्न करणाऱ्या लोकांचा मूलांक 8 असतa. अशा लोकांचे वैवाहिक जीवन यशस्वी असते. जर एखाद्या व्यक्तीचे लग्न 9, 18 आणि 27 तारखेला झाले असेल तर त्याचा मूलांक 9 असतो. वैवाहिक जीवनात काही चढ-उतार आले तरी त्यांचे वैवाहिक जीवन चांगले राहते.
हेही वाचा :
Numerology: पार्टनरला खूश ठेवण्यात पटाईत! 'या' जन्मतारखेच्या तरुणी अत्यंत रोमॅंटिक, दिसायला आकर्षक, नशीब सोबत घेऊन फिरतात, अंकशास्त्र
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















