Numerology: लग्न म्हणजे केवळ दोन लोकांमधील एक पवित्र नातेच नाही तर एक सांस्कृतिक आणि धार्मिक प्रतीक देखील आहे. या माध्यमातून एखाद्या जोडप्याचे जीवन आशीर्वाद आणि यशाने भरून जाते. मात्र काही लोक अजूनही योग्य वयात, योग्य वेळेत लग्न करत नाही. याची विविध कारणं असू शकतात, कोणी जबाबदाऱ्या असल्याने, कोणाला करिअर करायचे असल्यास, कोणाला लग्न म्हणजे स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखे वाटते, तर काही लोकांना लग्न म्हणजे जबाबदारीची भीती वाटते. अंकशास्त्रानुसार आज आपण अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल बोलणार आहोत, ज्या लोकांना त्यांचा जोडीदार लवकर मिळतो, ज्यामुळे ते लवकर लग्न करतात. यामुळे त्यांची आयुष्यातही लवकर प्रगती होते, पैसाही येतो..
'या' जन्मतारखेचे लोक लवकर लग्न करतात
अंकशास्त्राद्वारे तुमच्या जन्मतारखेवरून तुम्ही तुमचे भविष्य जाणून घेऊ शकता. तुमची जन्मतारीख तुमचे व्यक्तिमत्व आणि वर्तन सांगतो. ते जाणून घेणे आणि समजून घेतल्याने तुमचे जीवन सोपे होऊ शकते. अंकशास्त्रानुसार आज आपण अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल बोलणार आहोत, ज्या लोकांना त्यांचा जोडीदार लवकर मिळतो, ज्यामुळे ते लवकर लग्न करतात. या जन्मतारखेचे लोक लवकर लग्न करतात. यामुळे त्यांचे प्रेमातील वर्तन दिसून येते. शिवाय, त्यांना त्यांचा जोडीदार खूप लहान वयात भेटतो आणि लवकर लग्न करतात.
'या' जन्मतारखेचे लोक स्वभावाने खूप भावनिक
अंकशास्त्रानुसार, ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला असेल, अशा लोकांचा 2 हा मूलांक असतो. या संख्येचा स्वामी ग्रह चंद्र आहे. हे लोक स्वभावाने खूप भावनिक असतात. मूलांक 2 असलेले लोक स्वभावाने अत्यंत नाजूक आणि भावनांनी भरलेले असल्याने, ते खूप प्रेमळ असतात. त्यांच्यासाठी त्यांच्या जोडीदाराच्या आनंदापेक्षा काहीही महत्त्वाचे नसते. या लोकांना त्यांचा जोडीदार लवकर सापडतो, ज्यामुळे लवकर लग्न होते.
या जन्मतारखेचे लोक श्रीमंत
अंकशास्त्रानुसार, ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. त्यांचा स्वामी ग्रह शुक्र असतो. ते खूप आकर्षक आणि भौतिक सुखांनी परिपूर्ण असतात. ज्यांचा मूलांक 6 असतो, त्यांच्यावर शुक्र ग्रहाचा विशेष प्रभाव असतो. ते सौंदर्य, कला, प्रेम आणि कुटुंबाकडे आकर्षित होतात. या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनात खूप महत्त्वाच्या असतात. म्हणूनच, ते त्यांच्या इच्छित जोडीदारासोबत लवकर जुळवून घेतात.
या जन्मतारखेचे लोक जबाबदारी आणि उत्साहाने वागणारे..
अंकशास्त्रानुसार, ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 9 असतो. त्यांचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ जबाबदारी आणि उत्साहाने भरलेला असतो. हे लोक मंगळाचे गुण देखील प्रदर्शित करतात. ते स्वभावाने उत्साही आणि सक्रिय देखील असतात. तुम्हाला त्यांच्यात जबाबदारी आणि धैर्याचे गुण आढळतील. म्हणूनच ते लवकर लग्न करतात, कारण जबाबदारी घेणे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही.
हेही वाचा :
Raj Yog 2025: नवरात्रीच्या महानवमीपूर्वी 'या' 4 राशींवर धनाची उधळण! जबरदस्त 5 राजयोगांचा महासंगम, श्रीमंतांच्या यादीत सामील होण्याची वेळ
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)