Numerology: अनेक लोक त्यांचा मोबाईल क्रमांक (Mobile Number) किंवा कारचा क्रमांक अगदी विचार करून घेतात. कारण हा क्रमांक ते अगदी स्पेशल समजतात. पण कधी कधी आपल्या मोबाईल किंवा कारचे (Car Number) असे क्रमांक असतात, जे आपल्या आयुष्यात संकट आणू शकतात. अशात बरेच लोक अंकशास्त्रावर विश्वास ठेवतात आणि त्यांचा अभ्यास करतात. कारण अंकशास्त्रानुसार (Numerology) पाहायला गेलं तर मोबाईल फोन, कार आणि इतर अनेक क्रमांक तुमच्या नशिबावर परिणाम करतात. जाणून घेऊया अशा कोणत्या संख्या आहेत?
'या' संख्या अशुभ मानल्या जातात?
अंकशास्त्रानुसार, 1 ते 9 पर्यंतच्या प्रत्येक संख्येचे स्वतःचे महत्त्व आहे. संख्या 1 वर सूर्य, 2 वर चंद्र, 3 वर गुरु, 4 वर राहू, 5 वर बुध, 6 वर शुक्र, 7 वर केतू, 8 वर शनि आणि 9 वर मंगळाचे राज्य आहे. हे ग्रह एखाद्या व्यक्तीच्या करिअर, व्यवसाय, आर्थिक सवयी, निर्णय आणि नशिबावर प्रभाव पाडतात. म्हणून, संख्यांची पुनरावृत्ती शुभ किंवा अशुभ असू शकते.
तुमच्याही मोबाईल किंवा कारच्या नंबरमध्ये 'हे' डबल क्रमांक नाहीत ना?
- अंकशास्त्रानुसार, 4 (44 किंवा 444) ची पुनरावृत्ती केल्याने ताण, पोटाचे आजार आणि चुकीचे निर्णय घेण्याचा धोका वाढतो.
- 2 (22 किंवा 222) वारंवार असल्याने मानसिक अस्थिरता, वारंवार मनःस्थिती बदलणे आणि नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होतात.
- 8 (88 किंवा 888) वारंवार असल्याने आर्थिक नुकसान होते आणि कामात अडचणी येतात.
- 0 (00 किंवा 000) पुनरावृत्ती केल्याने ऊर्जा स्थिर होते, ज्यामुळे संधी गमावल्या जाऊ शकतात.
तर 'या' संख्येने शुभ परिणाम मिळतात...
अंकशास्त्रानुसार, काही डबल संख्या जसे की 1, 3, 5 किंवा 9 हे खूप शुभ मानले जातात. 1 आणि 11 हे अंक नेतृत्व आणि आत्मविश्वास वाढवतात. 3 आणि 33 उत्तम विचार आणि गुरुचे आशीर्वाद आणतात. 5 आणि 55 नवीन संधी आणि धैर्य आणतात. तर 9 आणि 99 यश, शक्ती आणि आदर वाढवतात.
तुमच्या मोबाईल नंबरचा मूळ क्रमांक शोधा.
तुमच्या मोबाईल नंबर किंवा कार नंबरचे सर्व अंक जोडा आणि त्या बेरीज केल्यास येणारी संख्या मूळ क्रमांक मानला जातो. उदाहरणार्थ, जर तुमचा मोबाईल नंबर 98760 43215 → (9 + 8 +7 +6 + 0 + 4 + 3 + 2 + 1 + 5 = 45 → 4 + 5 = 9) असेल, तर याचा अर्थ तुमच्या मोबाईल नंबरचा मूळ क्रमांक 9 आहे. जर तुमच्या कार किंवा मोबाईल नंबरचा मूलांक 4, 7, 8 किंवा 9 असेल, तर तो आयुष्यात वारंवार त्रास आणि आर्थिक अडचणी आणू शकतो. अशा संख्या बदलणे केव्हाही चांगले, असा सल्ला ज्योतिषींकडून देण्यात येतो.
हेही वाचा>>
Shani Transit 2026: 2026 वर्षाची सुरूवातच शनिच्या भव्य संक्रमणानं! मिथुनसह 'या' 3 राशींचे दिवस पालटलेच म्हणून समजा, हातात खेळेल पैसा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)