November Month Grah Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबरचा (November) महिना सुरु झाला आहे. या महिन्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. आतापर्यंत शुक्र ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन झालं आहे. तसेच, मंगळ (Mars) ग्रहाचं राशी परिवर्तन झालं आहे. तसेच, या महिन्याच्या शेवटपर्यंत अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे या काळात काही राशींना शुभ संकेत मिळणार आहेत. तर काही राशींना सावधान राहण्याची गरज आहे. तर या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

शुक्र ग्रह नक्षत्र परिवर्तन (Shukra Nakshatra Parivartan)

शुक्र ग्रहाने नोव्हेंबर महिन्यात कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश केला. तर, 26 नोव्हेंबर महिन्यात वृश्चिक राशीत असणार आहेत. शुक्र ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येईल. मेष आणि मिथुन राशींसाठी हा काळ शुभकारक असेल. तसेच, वृषभ आणि मीन राशींना सावधान राहण्याची गरज आहे. 

सूर्य ग्रह संक्रमण (Surya Gochar)

सूर्य ग्रह 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या काळात कर्क, सिंह आणि वृश्चिक राशीसाठी हा काळ शुभकारक असेल. तर, मेष आणि धनु राशीच्या लोकांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. 

Continues below advertisement

मंगळ ग्रह राशी परिवर्तन (Mars Transit)

मंगळ ग्रह 1 नोव्हेंबरपासून ते एप्रिलपर्यंत अस्त होणार आहेत. या काळात कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायी ठरेल. तसेच, वृषभ आणि मिथुन राशीच्या लोकांना सावधान राहण्याची गरज आहे. 

गुरु ग्रहाच्या संक्रमणाचा प्रभाव (Jupiter Transit)

गुरु ग्रह 11 नोव्हेंबर रोजी वक्री होणार आहे. या काळात शिक्षण, संपत्ती आणि कुटुंबाच्या बाबतीत लाभदायी ठरेल. कर्क, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभकारक ठरेल. 

बुध ग्रहाचं संक्रमण (Mercury Transit)

बुध ग्रह नोव्हेंबर महिन्यात पाच वेळा आपली स्थिती बदलणार आहे. यामुळे मेष, तूळ आणि धनु राशींना याचा चांगला लाभ मिळेल. या काळात सकारात्मक गोष्टी तुमच्याबरोबर घडतील. बुध ग्रहाला मजबूत करण्यासाठी गायत्री मंत्राचा जप करा. 

शनी ग्रहाची मार्गी चाल (Shani Margi)

शनी ग्रह 28 नोव्हेंबर रोजी मार्गी चाल चालणार आहे. या काळात तुमच्या जीवनात स्थिरता दिसून येईल. वृषभ, कर्क आणि मीन राशीसाठी हा काळ शुभकारक ठरणार आहे. या काळात शनी चालीसाचं पठण करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Guru Shani Gochar 2026 : नव्या वर्षाची सुरुवातच होणार धमाकेदार! 'या' राशींवर असणार गुरु-शनिचा आशीर्वाद, हातात मिळालेल्या संधीचं सोनं कराल