Nirjala Ekadashi 2026 : वर्षभरात एकूण 24 (अधिक मासात 26) एकादशी येतात. जर एखाद्या व्यक्तीला सर्व एकादशींचे व्रत करणे शक्य नसेल, तर केवळ एक 'निर्जला एकादशीचे' व्रत केल्यास वर्षभराच्या सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.

Continues below advertisement

भीमसेनी एकादशी: महाभारतातील कथेनुसार, महर्षी वेदव्यासांनी पांडवांना एकादशीचे महत्त्व सांगितले होते. मात्र, अन्नाशिवाय राहणे अशक्य असल्याने भीमाने वेदव्यासांना उपाय विचारला. तेव्हा व्यासांनी भीमाला केवळ ज्येष्ठ महिन्यातील या एकादशीला निर्जल (पाण्याविना) उपवास करण्यास सांगितले. त्यामुळे याला 'भीमसेनी एकादशी' किंवा 'पांडव एकादशी' असेही म्हणतात. यावर्षी ही एकादशी 25 जूनला आहे. 

राशीनुसार करा 'हे' उपाय 

मेष रास (Aries)

या राशीच्या व्यक्तींनी लाल वस्त्र, गूळ किंवा कलिंगड यांसारख्या लाल फळांचे दान करावे. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे लाभदायक ठरेल.

Continues below advertisement

वृषभ रास (Taurus)

पांढरे वस्त्र, दूध, ताक किंवा पाण्याचे दान करणे अत्यंत शुभ राहील. भगवान विष्णूंना पांढरी मिठाई अर्पण करावी.

मिथुन रास (Gemini)

हिरवे मूग, हिरवी फळे (जसे की द्राक्षे, पेरू) किंवा कडक उन्हापासून संरक्षणासाठी गरजू व्यक्तीला छत्री दान करावी.

कर्क रास (Cancer)

जलदानासाठी पाण्याचा माठ, दूध, तांदूळ किंवा साखरेचे दान करावे. चंद्राच्या अनुकूलतेसाठी हे उपाय विशेष फलदायी ठरतात.

सिंह रास (Leo)

तांब्याच्या भांड्यातून जलदान करणे, गहू किंवा आंब्याचे दान करणे शुभ राहील. सूर्याला अर्घ्य देताना पाण्यात थोडे कुंकू नक्की मिसळावे.

कन्या रास (Virgo)

गाईला हिरवा चारा खाऊ घालावा. तसेच गरजू व्यक्तींना थंड पाणी किंवा सरबताचे वाटप केल्यास बुध ग्रहाची अनुकूलता मिळते.

तूळ रास (Libra)

गोड लस्सी, पांढरे वस्त्र किंवा सुगंधी अत्तराचे दान करावे. माता लक्ष्मीला खीर अर्पण केल्यास सुख-समृद्धी वाढते.

वृश्चिक रास (Scorpio)

गूळ, लाल फळे (उदा. डाळिंब) किंवा तांब्याचे भांडे दान करावे. लाल फुलांनी भगवान विष्णूंची पूजा करावी.

धनु रास (Saggitarius)

पिवळे वस्त्र, केळी, हरभरा डाळ किंवा पिवळ्या मिठाईचे दान करावे. "ॐ नमो भगवते वासुदेवाय" या मंत्राचा जप विशेष फलदायी ठरेल.

मकर रास (Capricorn)

काळे तीळ, छत्री, पादत्राणे (चप्पल/बूट) किंवा मोहरीच्या तेलाचे दान करावे. यामुळे शनिदेवाचीही विशेष कृपा प्राप्त होते.

कुंभ रास (Aquarius)

पाण्याचा भरलेला माठ आणि काळी छत्री दान करावी. तसेच गरजू, अंध किंवा अपंग व्यक्तींना शक्य ती मदत करावी.

मीन रास (Pisces)

केळी, पिवळे चंदन, पिवळी फुले आणि धार्मिक पुस्तकांचे दान करावे. भगवान विष्णूंना पिवळे चंदन लावणे अत्यंत शुभ मानले जाते.

डॉ. भूषण ज्योतिर्विद

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shubh Yog 24 June 2026 : आज साध्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; तूळ राशीसह 5 राशींवर देवी लक्ष्मी होणार प्रसन्न, घरात पैशांचा लखलखाट