Gayatri Mantra Benefits: देवीची आराधना करण्याचा उत्सव अर्थात नवरात्रोत्सव (Navratri 2022) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या काळात देवी दुर्गाच्या विविध रूपांची मनोभावे पूजा करून, देवीचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. हिंदू धर्मात पूजा-अर्चनेसह मंत्र पठणाला देखील विशेष महत्त्व आहे. मंत्रपठण केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते, असे म्हटले जाते. देवीची आराधना करताना गायत्री मंत्राला विशेष महत्त्व आहे.
वेद शास्त्रात देखील गायत्री मंत्राचे विशेष महत्त्व आहे. गायत्री मंत्राचा नियमित जप केल्याने मनुष्य जन्मातील अनेक त्रासांपासून मुक्ती मिळते. या मंत्राच्या पठणाने रागावर नियंत्रण मिळवता येते, असे देखील म्हटले जाते. नियमित गायत्री मंत्राचा जप केल्याने इतरही अनेक परिमाण दिसून येतात. मात्र, या मंत्राचे पठण करण्याचे देखील काही नियम आहे. या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
गायत्री मंत्र
ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्।
याचा अर्थ तिन्ही लोकांत व्यापून असणाऱ्या, आणि या सृष्टीला प्रकाशमान करणाऱ्या श्रेष्ठ परमतत्व श्री सूर्य नारायणाचे आम्ही ध्यान करतो. त्याच्या आशीर्वादाने आम्हाला सत्कर्म करण्याची बुद्धी लाभो.
गायत्री मंत्राचा जप करण्याचे नियम :
* गायत्री मंत्राचा जप नेहमी सूर्योदयाच्या दोन तास आधी आणि सूर्यास्ताच्यानंतर एक तास करावा, अन्यथा त्याचा अपेक्षित लाभ मिळणार नाही.
* मौन राहून मनातल्या मनात गायत्री मंत्राचा जप करता येतो. मात्र, रात्रीच्या वेळी या मंत्राचा जप करणे टाळावे.
* नेहमी अंघोळ केल्यावर पिवळे वस्त्र परिधान करूनच गायत्री मंत्राचा जप करावा. काळे कपडे किंवा गडद रंगाचे कपडे घालून या मंत्राचा जप कधीही करू नये.
* दक्षिणेकडे तोंड करून कधीही गायत्री मंत्राचा जप करू नये. नेहमी पूर्व दिशेला तोंड करून जप करणे शास्त्रानुसार लाभदायी मानले जाते.
* मांस, मासे किंवा मद्य सेवन केल्यानंतर चुकूनही गायत्री मंत्राचा जप करू नका. असे केल्यास तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. अर्थात याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.
* कधीही जमिनीवर बसून गायत्री मंत्राचा जप करून नये. एखादे आसन किंवा चटई अंथरून त्यावर बसूनच या मंत्राचा जप करावा.
* रुद्राक्ष माळ घेऊन गायत्री मंत्राचा जप करणे अतिशय लाभदायी मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :