Navpancham Rajyog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रात, मंगळ (Mars) ग्रहाला नवग्रहांमध्ये सर्वात प्रभावशाली ग्रहांपैकी एक मानतात. हा ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो. त्यामुळेच याचा परिणाम सर्व 12 राशींवर दिसून येतो. सध्या मंगळ ग्रह वृश्चिक राशीत विराजमान आहे. यामुळे रुचक राजयोग निर्माण होतोय. मंगळ ग्रहाचं या राशीत वास्तव्य असल्या कारणाने ग्रहाबरोबर युती होऊन अनेक शुभ-अशुभ योग निर्माण होतात. अशातच 4 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज वरुणसह संयोग करुन नवपंचम राजयोग (Navpancham Rajyog) निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींना चांगलाच लाभ मिळेल. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Continues below advertisement

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी मंगळ आणि वरुण ग्रह एकमेकांच्या 120 डिग्रीवर असणार आहेत. यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. मंगळ ग्रह सध्या वृश्चिक राशीत तर वरुण मीन राशीत विराजमान आहे. वरुण एका राशीत जवळपास 14 वर्षांपर्यंत स्थित असतात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि वरुण ग्रहाचा नवपंचम राजयोग फार शुभ संकेत देणारा ठरणार आहे. या राजयोगामुळे तुमच्या आयुष्यात एका मागोमाग सकारात्मक घटना घडताना दिसतील. तरुणांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं. तसेच, अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत असेल. 

Continues below advertisement

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी नवपंचम राजयोग फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या भौतिक सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी नवपंचम राजयोग फार लकी ठरणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात अचानकपणे वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्यातील प्रभावशाली नेतृत्व दिसेल. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला असून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. रखडलेली कामे लवकरच पूर्ण होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Angarak Yog 2025 : मंगळ-राहूचा भयानक 'अंगारक योग' बनला; 7 डिसेंबरपर्यंत 'या' 3 राशींवर ओढावणार संकट, 'ही' चूक टाळा