Navpancham Rajyog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध आणि गुरु ग्रह एका ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतात. जिथे बुध ग्रह महिन्यातून दोन वेळा राशी परिवर्तन करतात. तर, गुरु ग्रह वर्षातून एकदा आपल्या स्थितीत बदल करतात. मात्र, यंदा गुरु ग्रह अतिचारी चाल चालणार आहेत. अशातच ऑक्टोबर महिन्यात जवळपास दोनदा कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर, डिसेंबर महिन्यात पुन्हा मिथुन राशीत येणार आहे. या दरम्यान अनेक शुभ-अशुभ योग (Yog) निर्माण होणार आहे. येत्या 24 ऑक्टोबर रोजी गुरु आणि बुध ग्रहाच्या संयोगाने शक्तिशाली नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. यामुळे तीन राशींना चांगला लाभ मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 8 वाजून 35 मिनिटांनी गुरु-बुध ग्रह एकमेकांच्या 120 डिग्रीवर असणार आहे. यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. या काळात गुरु ग्रह वृश्चिक राशीत नवव्या आणि कर्क राशीत बुध ग्रह पंचम चरणात असल्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
या राशीसाठी गुरु-बुध ग्रहामुळे निर्माण होणारा नवपंचम राजयोग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात बुध ग्रह लग्न भावात गुरु विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तुमचं धार्मिक कार्यात मन रमेल. अध्यात्मात तुमची रुची वाढेल. तसेच, नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. तसेच, नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी गुरु-बुध ग्रहामुळे निर्माण होणारा नवपंचम राजयोग सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात तुमची प्रगती दिसून येईल. तसेच, जमिनीच्या संदर्भातील तुमचे जुने वादविवाद मिळतील. नवीन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी नवपंचम राजयोग शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
