Navapancham Rajyog 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालीचा मानवी जीवनावर तसेच देशभरात परिणाम पाहायला मिळतो. जेव्हा दोन शुभ ग्रह एकमेकांना भेटतात तेव्हा त्यापासून निर्माण होणाऱ्या योगाने जीवनात सुख, शांती, समृद्धी येते. तसेच, प्रगतीची दारं खुली होतात. नवीन वर्षात असाच दुर्लभ तसेच, प्रभावशाली योग जुळून येणार आहे. या योगाला नवपंचम राजयोग म्हणतात. हा योग देवगुरु बृहस्पती आणि ग्रहांता राजकुमार बुध ग्रहाच्या संयोगाने जुळून येणार आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 2 वाजून 59 मिनिटांनी गुरु आणि बुध ग्रह एकमेकांच्या 120 डिग्री अंशावर स्थित असणार आहे. या काळात मिथुन राशीत गुरु ग्रह विराजमान असणार आहे. तर बुध ग्रह बुध राशीत संक्रमण करणार आहे. कुंभ राशीत बुध ग्रहाची युती सूर्य, शुक्र आणि राहू ग्रहाबरोबर होणार आहे. यामुळे हा योग अधिक शक्तिशाली होणार आहे. नवपंचम राजयोग कोणकोणत्या राशींसाठी शुभकारक ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी गुरु-बुध ग्रहाचा नवपंचम राजयोग फाल लाभदायी ठरणार आहे, या राशीच्या गुरु चतुर्थ भावात आणि बुध बाराव्या चरणात संक्रमण करणार आहे. या काळात तुम्ही परदेशी प्रवास करु शकता, आयात निर्यात करु शकता. तसेच, या काळात तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. मात्र, भविष्यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअर आणि व्यक्तिमत्व विकासात चांगली सुधारणा दिसून येईल. तसेच, तुमची महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील. तुमच्या बौद्धिक क्षमतेचा चांगला विकास होईल. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, अभ्यासात मन रमेल. तुमच्या प्रेमजीवनात स्थिरता दिसून येईल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या लग्न भावात बुध ग्रह असल्याने बुद्धी, वाणी आणि निर्णय क्षमता मजबूत दिसेल. तुमच्या मंजुळ वाणीने लोक प्रभावित होतील. तसेच, मुलांची शिक्षणात चांगली प्रगती दिसून येईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती अधिक चांगली होईल. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य असणार आहे. 

हे ही वाचा : 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो नोव्हेंबरचा नवा आठवडा नशीब पालटणारा! कसा जाणार आठवडा? साप्ताहिक राशीभविष्य