Moon Transit 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाचे स्वत:चे महत्त्व आहे, मात्र त्यापैकी चंद्राला विशेष महत्व आणि स्थान आहे. चंद्र हा सूर्यानंतरचा दुसरा ग्रह आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात चंद्र हा शुभ ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रात जिथे सूर्य पिता आहे आणि चंद्र हा स्त्री ग्रह मानला जातो. सर्व 9 ग्रहांमध्ये चंद्राचा वेग सर्वात जास्त आहे. चंद्र फक्त कमी कालावधीसाठी राशीत संक्रमण करतो. चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीचा प्रवास सुमारे अडीच दिवसात पूर्ण करतो. वैदिक ज्योतिषात, कुंडलीची गणना व्यक्तीच्या चंद्र राशीच्या आधारे केली जाते. 

चंद्र शनीच्या नक्षत्रात प्रवेश करणार...

चंद्र जर एखाद्या व्यक्तीच्या लग्न राशीत चांगला असेल तर ती व्यक्ती अतिशय सुंदर, कल्पक, भावनिक, संवेदनशील आणि पाहण्यास धैर्यवान असते. पत्रिकेत चंद्र बलवान असेल तर व्यक्ती मानसिकदृष्ट्या मजबूत आणि आनंदी राहते. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र सर्वात वेगाने राशी बदलतो. पंचांगानुसार, रविवार, 9 मार्च रोजी चंद्र शनीच्या नक्षत्रात प्रवेश करेल. रात्री 11:54 वाजता पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल. याचा सर्व राशींवर चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, जाणून घेऊया रविवारी रात्रीपासून कोणत्या 3 राशींचे भाग्य चमकू शकते.

कर्क

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांसाठी चंद्राचा रास बदल फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंधित बाबींमध्ये यश मिळवू शकाल. आर्थिक स्थिती सुधारेल. आत्मविश्वास पूर्वीपेक्षा मजबूत होईल. मन पूर्वीपेक्षा अधिक आनंदी राहील. नातेसंबंध सुधारू शकतात. संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ होतील.

वृश्चिक

ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. संबंध पूर्वीपेक्षा चांगले होतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे सहकार्य मिळेल ज्यामुळे कामात यश मिळेल. परस्पर मतभेद दूर होतील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.

कुंभ

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीसाठी चंद्राचे भ्रमण फलदायी ठरेल. जीवनात सकारात्मक बदल घडतील जे प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील. नात्याची ताकद वाढेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. सामाजिक सन्मान वाढू शकतो. मनात एक वेगळाच आनंद राहील. नातेवाईकांशी संबंध सुधारू शकतात. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. नोकरदार लोकांचे उत्पन्न वाढू शकते.

हेही वाचा>>

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी मार्च महिन्याचा नवीन आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )