Monthy Horoscope June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्यापासून जून महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्यात अनेक ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे हा महिना फार खास असणार आहे. या ठिकाणी बारा राशींसाठी जून महिना नेमका कसा असणार आहे? हे ज्योतिषशास्त्र समृद्धी दाऊलकर यांनी सांगितलं आहे. तर, जाणून घेऊयात मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope).

मेष रास (Aries Horoscope)

जून 2025 मध्ये करियरमध्ये नवीन संधी प्राप्त होतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याबाबत थोडं काळजी घ्या – डोकेदुखी किंवा उष्णतेची तक्रार होऊ शकते.

शुभ दिवस: 5, 12, 21शुभ रंग: लालउपाय: मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा.

वृषभ रास (Taurus Horoscope)

गुंतवणुकीसाठी उत्तम महिना आहे. उत्पन्नात वाढ होईल. परदेशातून काही चांगल्या बातम्या येऊ शकतात. नातेसंबंधांमध्ये मिठास राहील. आरोग्य चांगले राहील पण थोडं मानसिक ताण जाणवेल.

शुभ दिवस: 4, 16, 24शुभ रंग: पांढराउपाय: शुक्रवारी देवीला दुग्ध अभिषेक करा.

मिथुन रास (Gemini Horoscope)

संयम राखण्याची आवश्यकता आहे. व्यावसायिक बाबतीत सावधगिरी बाळगा. जुनी मित्रमंडळी मदतीला येतील. विद्यार्थ्यांसाठी उत्तम वेळ आहे. प्रवास टाळावा.

शुभ दिवस: 3, 9, 30शुभ रंग: हिरवाउपाय: बुधवारी दुर्गा स्तोत्र वाचा.

कर्क रास (Cancer Horoscope)

नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कुटुंबात काही मतभेद होऊ शकतात. आरोग्याबाबत विशेष काळजी घ्या. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवा.

शुभ दिवस: 1, 13, 22शुभ रंग: क्रीमउपाय: सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा.

सिंह रास (Leo Horoscope)

महत्त्वाची कामं पूर्ण होतील. जमीन-जायदाद संबंधित कामात यश मिळेल. प्रेमसंबंधात प्रगती होईल. वरिष्ठांचे मन जिंकता येईल. सर्जनशील कामांमध्ये लक्ष लागेल.

शुभ दिवस: 7, 19, 26शुभ रंग: केशरीउपाय: रविवारी सूर्यनमस्कार करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

प्रवास घडतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. कार्यक्षेत्रात स्पर्धा वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मैत्रीमध्ये थोडा सावधपणा गरजेचा आहे.

शुभ दिवस: 6, 14, 29शुभ रंग: पिस्ता हिरवाउपाय: बुधवारचा उपवास करा.

तुला रास (Libra Horoscope)

करिअरमध्ये उत्तम संधी मिळू शकते. नवीन प्रकल्प सुरू होऊ शकतो. वैवाहिक जीवनात सुधारणा होईल. आरोग्य उत्तम राहील. थोडेसे आर्थिक उतार-चढाव शक्य आहेत.

शुभ दिवस: 2, 10, 27शुभ रंग: गुलाबीउपाय: शुक्रवारी लक्ष्मी पूजन करा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

नवीन व्यावसायिक संधी मिळतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. मन प्रसन्न राहील. जुने कामे पूर्ण होतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे.

शुभ दिवस: 8, 17, 25शुभ रंग: लालउपाय: मंगळवारी रक्तदान किंवा अन्नदान करा.

धनु रास (Sagittarius Horoscope)

संपत्ती, प्रतिष्ठा आणि मान मिळेल. मानसिक स्थैर्य राहील. थोडेसे वैवाहिक जीवनात गोंधळ होऊ शकतो. नवीन कामात यश मिळेल.

शुभ दिवस: 5, 15, 28शुभ रंग: पिवळाउपाय: गुरुवारी गुरुपूजन करा.

मकर रास (Capricorn Horoscope)

प्रगतीचा काळ आहे. सरकारी कामात यश मिळेल. घरात मंगल कार्य होईल. वैचारिक मतभेद कमी होतील. जुनी संपत्ती मिळू शकते.

शुभ दिवस: 9, 18, 30शुभ रंग: राखाडीउपाय: शनिवारी काळ्या वस्त्रांचे दान करा.

कुंभ रास  (Aquarius Horoscope)

काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मनावर ताण जाणवेल. आर्थिक विषयात काळजी घ्या. मित्रांकडून मदत मिळेल. मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या.

शुभ दिवस: 11, 20, 29शुभ रंग: निळाउपाय: शनिवारी झाडांना पाणी घाला.

मीन रास (Pisces Horoscope)

नवीन संधी तुमच्या दाराशी आहेत. प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल. आरोग्य उत्तम राहील. खर्च वाढेल पण उत्पन्नातही सुधारणा होईल.

शुभ दिवस : 3, 12, 23शुभ रंग : पांढरट निळाउपाय : गुरुवारी गायींना हरण घालावे.

- समृद्धी दाऊलकर

हे ही वाचा : 

Shukra Gochar 2025 : पुढचे 23 दिवस 'या' राशींना सावधानतेचा इशारा; शुक्राच्या संक्रमणामुळे कोसळणार संकटांचा डोंगर, पदोपदी मिळेल इशारा