Margshirsh Guruwar 2025: पंचांगानुसार, आज 19 नोव्हेंबर 2025..कार्तिक अमावस्या आहे..ही अमावस्या समाप्त झाली की मार्गशार्ष महिना सुरू होतोय. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना (Margshirsh 2025) हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो, अनेक व्रत-वैकल्य, सण, शुभ कार्य या महिन्यात साजरे केले जातात. याहूनही महत्त्वाचं म्हणजे अनेक जण मार्गशार्ष महिन्याच्या प्रत्येक गुरूवारी देवी लक्ष्मीचे (Goddess Lakshmi) प्रतीक म्हणून घट मांडतात, आणि त्याचे व्रत करतात. यंदा मार्गशीर्ष महिना 21 डिसेंबर 2025 पासून सुरु होणार आहे. पण यंदा कोणत्या तारखेला आणि किती गुरुवार (Margshirsh Guruwar 2025) असतील? तसेच मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे महत्त्व, पूजा विधी काय आहे? हे डॉ भूषण ज्योतिर्विद यांच्याकडून जाणून घेणार आहोत...
मार्गशीर्ष 2025 महिन्याच्या पहिल्या गुरूवारी अमावस्या तिथी? (Margshirsh Guruwar 2025)
ज्योतिषींच्या मते, कार्तिक अमावस्या तिथी (बुधवार, 19 नोव्हेंबर) सकाळी सुरू झाली आहे. उद्या (गुरुवार, 20 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजून 16 मिनिटांनी समाप्त होईल. पंचांगानुसार, अमावस्या तिथी गुरुवारी सूर्योदयाच्या वेळी असल्याने, ही अमावस्या 20 नोव्हेंबर रोजी पाळली जाईल.
मार्गशीर्ष 2025 महिन्याची सुरुवात कधी?
ज्योतिषींच्या मते, अमावस्या संपल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे, मार्गशीर्ष महिना शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025 पासून मानला जाईल
मार्गशीर्ष गुरुवार व्रत कधी करायचे?
ज्योतिषींच्या मते, 20 नोव्हेंबर रोजी मार्गशीर्षचा गुरुवार असला तरी तो मार्गशीर्ष महिन्याचा नसून अमावस्येचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी घट मांडला जाणार नाही. पहिले मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे पुढील आठवड्यात, गुरुवार, 27 नोव्हेंबर 2025 रोजी असेल.
मार्गशीर्ष महिन्यात किती गुरूवार?
- पहिला गुरूवार: 27 नोव्हेंबर
- दुसरा गुरूवार: 04 डिसेंबर
- तिसरा गुरूवार: 11 डिसेंबर
- चौथा गुरूवार: 18 डिसेंबर
मार्गशीर्ष गुरुवारचा घट कसा मांडाल?
- घट ज्या ठिकाणी मांडाल, तिथली जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढावा.
- त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा.
- चौरंगावर लाल कापड ठेवून त्यावर तांदूळ, त्यावर तांब्याचा कलश ठेवावा.
- कलशाला हळद-कुंकु लावून आत पाणी, अक्षता, दूर्वा, एक नाणं आणि सुपारी घालावी.
- विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी, पंचपात्र कलशावर ठेवावी, त्यावर नारळ ठेवावा.
- लाल कापडावर थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलशाची स्थापना करा,
- आता त्याठिकाणी श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे.
- कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा.
- यथाशक्ती नैवेद्य दाखवू शकता.
हेही वाचा
Mahalakshmi Rajyog 2025: दु:खाचे दिवस गेले, मार्गशीर्ष महिना 4 राशींची भरभराट करणार! 20 नोव्हेंबरला महालक्ष्मी राजयोग बनतोय, पैसा, करिअर, प्रेम...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)