March Month Calendar 2025 : हिंदू धर्मग्रंथात पूजा, तिथी आणि सणांना (Festivals)विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. वर्षाच्या 12 महिन्यांतील प्रत्येक महिन्यात काही उपवास, तिथी आणि सण साजरे केले जातात. हे सण-समारंभ वेगवेगळ्या देवी-देवतांना समर्पित आहे. फेब्रुवारी महिना संपून आता मार्च महिन्याला सुरुवात होणार आहे. मार्च महिन्यात होळी, धूलिवंदन, गुढीपाडवा आणि संकष्ट चतुर्थीसह अनेक मोठे सण साजरे केले जाणार आहेत. तर मार्च महिन्यात कोणते प्रमुख सण साजरे केले जाणार आहेत ते जाणून घेऊयात.
मार्च महिना सणांची संपूर्ण यादी येथे पाहा
2 मार्च रविवार - मुस्लिम रमजान मासारंभ
3 मार्च सोमवार - विनायक चतुर्थी
7 मार्च शुक्रवार - दुर्गाष्टमी
8 मार्च शनिवार - जागतिक महिला दिन
10 मार्च सोमवार - अमलकी एकादशी
13 मार्च गुरुवार - होळी
14 मार्च शुक्रवार - धूलिवंदन
17 मार्च सोमवार - संकष्ट चतुर्थी चंद्रोदय 09.20
17 मार्च सोमवार - छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे)
25 मार्च मंगळवार - पापमोचनी एकादशी
28 मार्च शनिवार - अमावस्या प्रारंभ
30 मार्च रविवार - गुढीपाडवा
31 मार्च सोमवार - रमजान ईद
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
