March Grah Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, लवकरच फेब्रुवारीचा (February 2026)महिना संपून मार्च महिना सुरु होणार आहे. हा महिना ग्रहांच्या चालीनुसार फार खास मानला जाणार आहे. खरंतर, मार्च महिन्याची सुरुवातच ग्रहांच्या बॅक टू बॅक संक्रमणाने होणार आहे. 2 मार्च रोजी शुक्र देव मीन राशीत संक्रमण करणार आहे. त्यानंतर 3 मार्च रोजी प्लूटो ग्रह श्रवण नक्षत्रात संक्रमण करेल. याच दिवशी मंगळ ग्रह शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यानंतर, 4 मार्च रोजी शुक्र ग्रह उत्तरा भाद्रपद नक्षत्रात संक्रमण करणार आहे. शेवटी 5 मार्च रोजी सूर्य ग्रह पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ग्रहांच्या या बॅक टू बॅक संक्रमणाने पाच राशींसाठी हा काळ फार शुभकारक ठरणार आहे. त्यामुळे या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
ग्रहांच्या या बॅक टू बॅक संक्रमणाचा मेष राशीवर सकारात्मक परिणाम होणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनप्राप्ती होईल. तसेच, करिअरमध्ये तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील. समाजात तुमची पद-प्रतिष्ठा टिकून राहील. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांना करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. या काळात तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची सेल तर त्यासाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांची कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती दिसून येईल. प्रवासाचे योगदेखील लवकरच जुळून येणार आहेत. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली सुधारलेली असेल. करिअरमध्ये अनेक नवीन संधी तुम्हाला मिळतील. लहान मुलांच्या कलागुणांचा देखील चांगला विकास झालेला दिसेल. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असणार आहे.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांना या काळात अचानक धनलाभ होईल. अनेक नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. तसेच, जर तुम्हाला पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी हा काळ शुभ असणार आहे. पैशांची गुंतवणूक देखील तुम्ही या काळात करु शकता. व्यवसायातून तुम्हाला दुप्पट लाभ मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा असणार आहे. या कालावधीत तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती पाहायला मिळेल. उत्पन्नाची आवक वाढले. तसेच, जर तुम्हाला नवीन घर किंवा वाहन विकत घ्यायचं असेल तर त्यासाठी हा शुभ काळ असणार आहे. घरातील वातावरण आनंदी असेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
