Mangal Shani Yuti : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळानंतर संक्रमण, राशी परिवर्तन करतात. ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या 14 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजून 59 मिनिटांनी मंगळ (Mars) आणि शनी (Shani Dev) ग्रह एकमेकांपासून 108 डिग्रीच्या अंतरावर असणार आहेत. तसेच, मंगळ आणि शनीच्या या योगामुळे त्रिदशांक योग निर्माण होणार आहे. तसेच, जोपर्यंत मंगळ ग्रह धनु राशीत आणि शनि ग्रह मीन राशीत विराजमान आहे. तोपर्यंत हा योग असणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग फार लाभदायी ठरणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तसेच, भौतिक सुख-समृद्धीत वाढ झालेली दिसेल. जर तुम्हाला एखादी नवीन वस्तू खरेदी करायची असेल, एखादं वाहन खरेदी करण्यासाठी ही शुभ वेळ असणार आहे. तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. नवीन गोष्टींचा अनुभव घ्याल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग फार लाभदायी ठरणार आहे. या कालावधीत तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करु शकता. वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील. घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, आर्थिक स्थितीत
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी मंगळ-शनिचा हा योग शुभकारक ठरणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल. नवीन गोष्टी शिकता येतील. घरात आनंदी वातावरण राहील. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांची पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. मित्रांच्या सहकार्याने तुम्ही सगळी कामे पूर्ण होताना दिसतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)