Mangal Rahu Yuti 2025 : मंगळ राहू आणि शनिची युती! पुन्हा एकदा संकटाची लागणार चाहूल; 'या' 5 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर
Mangal Rahu Yuti 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 28 जुलै 2025 रोजी षडाष्टक योग निर्माण होणार आहे. मंगळ, राहू आणि शनि या तिन्ही ग्रहांचा 5 राशींवर परिणाम होणार आहे. या राशी कोणत्या ते पाहूयात.

Mangal Rahu Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या सहाव्या आणि आठव्या चरणात असतात तेव्हा षडाष्टक नावाचा योग जुळून येतो. ज्योतिष शास्त्रात हा योग फार अशुभ मानला गेला आहे. या काळात अनेक अशुभ घटना घडतात. तसेच, याचा परिणाम जागतिक पातळीवर देखील पाहायला मिळतो. एप्रिल महिन्यात मंगळ (Mars) ग्रहाने कर्क राशीत संक्रमण केलं होती. तर, राहूने (Rahu) मीन राशीत संक्रमण केलं होतं. या दरम्यान षडाष्टक योग निर्माण झाला होता. या काळात देशविदेशात अनेक आपात्कालिन घटना घडल्या. ज्याचे परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागले.
ज्योतिष शास्त्रानुसार, पुन्हा एकदा 28 जुलै 2025 रोजी षडाष्टक योग निर्माण होणार आहे. यावेळी मंगळ ग्रह संक्रमण करुन कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर, कुंभ राशीत राहू विराजमान आहे. यामुळे मंगळ-राहूमध्ये हा योग निर्माण होणार आहे. हा योग 13 सप्टेंबरपर्यंत असेल. त्याचबरोबर या काळात शनीसुद्धा वक्री चाल चालणार आहे. त्यामुळे या तिन्ही ग्रहांचा 5 राशींवर परिणाम होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी षडाष्टक योग फार नुकसानकारक ठरणार आहे. या काळात तुमच्यात अनेक वादविवाद, तमाव होऊ शकतात. तसेच, वाहन चालवताना काळजी घ्या. धनहानी देखील होऊ शकते.
तूळ रास (Libra Horoscope)
षडाष्टक योगामुळे तूळ राशीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार आहे. या काळात तुमच्या खर्चात विनाकारण वाढ होईल. तसेच, तुम्हाला अनेक आजारही उद्भवू शकतात.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी मंगळ-राहूचा षडाष्टक योग फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुमच्या नोकरी-व्यवसायात अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच, तुमच्या मेहनतीचं फार कमी फळ तुम्हाला मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांनी या काळात दूरचा प्रवास करु नये. तसेच, वाहन चालवताना काळजी घ्यावी. कोणतीही महत्त्वाची कामे तुम्ही या काळात हाती घेऊ नका. ध्येयावर लक्ष केंद्रित करा.
मीन रास (Pisces Horoscope)
मंगळ-राहूचा षडाष्टक योग मीन राशीसाठी फार कठीण काळ ठरु शकतो. य़ा काळात तुमचे पार्टनरबरोबर वादविवाद होतील. तसेच, तुमच्या कामात तुमचं मन रमणार नाही. तुम्ही वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :


















