Mangal Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 23 फेब्रुवारी रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ (Mangal Gochar) ग्रह कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. या राशीत राहू, बुध, सूर्य आणि शुक्र चतुर्ग्रही योग आधीपासूनच निर्माण झाला आहे. त्यामुळे कुंभ राशीत होणारं मंगळ ग्रहाचं संक्रमण फार खास असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाला शक्तिशाली आणि साहसी ग्रह म्हणतात. कुंडलीत जर मंगळ ग्रहाची स्थिती चांगली असेल तर व्यक्तीचं कठीण कामही आरामात होतं. त्यामुळे मंगळ ग्रहाचं संक्रमण इतर राशींसाठी (Zodiac Signs) नेमकं कसं असणार आहे ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मंगळ ग्रह या राशीच्या अकराव्या चरणात संक्रमण करणार आहे. मंगळ ग्रह या स्थानी असल्यामुळे तुमच्या आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तसेच, अनेक काळापासून तुमची रखडलेली कामे वेळेत पूर्ण कारल. कुटुंबियांकडून तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

या राशीच्या दहाव्या स्थानी मंगळ ग्रह संक्रमण करणार आहे. या संबंध थेट तुमच्या करिअरशी आणि आई-वडिलांशी जोडण्यात येतो. त्यामुळे या कालावधीत तुम्ही करिअरच्या उंच शिखरावर असाल. तुमच्या संपत्तीत चांगली भरभराट पाहायला मिळेल. तसेच, कोर्ट-कचेरीच्या संदर्भातील तुमच्या सर्व समस्या दूर होतील. 

Continues below advertisement

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

या राशीच्या चौथ्या स्थानी मंगळ ग्रहाचं संक्रमण होणार आहे. याचा संबंध तुमच्या वाहन, जागा आणि आई-वडिलांशी जोडण्यात येतो. या कालावधीत तुम्ही नवीन वाहनांची खरेदी करु शकता. तसेच, तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करु शकता. कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, उत्पन्नाचे नवे सोर्स निर्माण होतील.  

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या दुसऱ्या चरणात मंगळ ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल. तसेच, तुमच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. तुमचा आत्मविश्वास दुपटीने वाढेल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. 

हे ही वाचा :                              

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Panchak 2026 : पंचक काळात चुकूनही करु नका 'या' गोष्टी; वाचा काय शुभ काय अशुभ?