Mangal Gochar 2026 : मंगळ ग्रहाचं महासंक्रमण, 4 राशींसाठी राजयोग; मे महिन्यात 'या' राशींना लागणार जॅकपॉट, हातात येणार पैसा
Mangal Gochar 2026 : मे 2026 मध्ये मंगळ ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या जीवनात मोठे बदल घडून येतील.

Mangal Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ (Mangal Gochar) ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हणतात. लवकरच मंगळ ग्रह आपली चाल बदलणार आहे. मे 2026 मध्ये मंगळ ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या जीवनात मोठे बदल घडून येतील. मंगळ ग्रहाच्या या संक्रमणामुळे ग्रहांची स्थिती शुभ मानली जाणार आहे. मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनाने काही राशींमध्ये राजयोगासारखी स्थिती निर्माण होणार आहे.
जर तुमची रास सुद्धा यामध्ये असेल तर तुमचे लवकरच चांगले दिवस सुरु होणार आहेत. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चार लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचं हे संक्रमण वरदानासारखं ठरेल. या काळात तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. कामकाजात तुमची प्रगती दिसून येईल. तसेच, जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला नोकरी मिळेल. परदेशात जाण्याची चांगली संधी मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे सोर्स निर्माण होतील. जे लोक बिझनेस करतायत त्यांना चांगली डील मिळू शकते. तसेच, समाजात तुमची चांगली प्रतिष्ठा निर्माण होईल. वडिलोत्पार्जित संपत्तीचा तुम्हाला लाभ घेता येईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ भरभराटीचा असणार आहे. या काळात कोर्ट कचेरीच्या कामकाजात तुम्हाला यश मिळेल. तसेच, तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तसेच, कर्जातून मुक्ती मिळेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्याचा असणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला गोष्टी करता येतील. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला न्याय मिळेल. मंगळ ग्रहाच्या कृपेने अनेक गोष्टी तुम्हाला साध्य करता येतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Shani Uday 2026 : शनिचा होतोय उदय! 22 एप्रिलपासून 'या' 3 राशींचं टेन्शन कायमचं संपणार; नोकरी, पैसा, संपत्तीत होणार भरभराट



















