Mangal Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या 28 जुलै 2025 रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ (Mangal Gochar) ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहाला क्रूर ग्रह मानलं जातं. हा ग्रह ऊर्जा, साहस आणि संघर्षाचा प्रतीक मानला जातो. असं म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ कमजोर स्थितीत असेल तर स्वास्थ्य आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. पण, जेव्हा मंगळ ग्रह आपली रास बदलतात तेव्हा काही राशींच्या आयुष्यात मोठे बदल घडतात. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मंगळ ग्रहाचं कन्या राशीत होणारं संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी फार आव्हानात्मक ठरु शकतं. या काळात तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. तसेच, कौटुंबिक जीवनात तणावाचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराबरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात. अशा वेळी कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. तसेच, वाहन चालवताना काळजी घ्या.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
मंगळ ग्रहाचं संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी फार अशुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमणार नाही. पती-पत्नीच्या नात्यात गैरसमज वाढतील. तसेच, या काळात शेअर बाजारातही गुंतवणूक करु नका. ग्रहांच्या अशुभ परिणामांपासून वाचण्यासाठी भगवान हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचं तेल चढवा.
मीन रास (Pisces Horoscope)
मंगळ ग्रहाचं संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या खर्चात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचा आर्थिक बजेट कोलमडेल. तसेच, तुमच्या मेहनतीला यश मिळणार नाही. या काळात अनेक गैरसमजही होतील ते वेळीच दूर करण्याचा प्रयत्न करा. ग्रहांचा अशुभ प्रभाव या राशीच्या लोकांवर पडणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :