Mangal Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या 7 डिसेंबर रोजी मंगळ ग्रहाचं (Mangal Gochar) संक्रमण होणार आहे. मंगळ ग्रह सध्या वृश्चिक राशीत विराजमान आहे. त्यानुसार, 7 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मंगळ ग्रह धनु राशीत (Zodiac Signs) प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाचं धनु राशीत होणार संक्रमण फारच आव्हानात्मक मानलं जातं. मंगळ ग्रह धनु राशीत 16 जानेवारी 2026 च्या सकाळी 4 वाजून 36 मिनिटांपर्यंत स्थित असणार आहे. म्हणजेच, मंगळ ग्रह एकूण 40 दिवसांपर्यंत विराजमान असणार आहे. 

Continues below advertisement

मंगळ ग्रहाच्या या संक्रमणाचा प्रभाव नवीन वर्षावर देखील पडणार आहे. त्यामुळे मंगळ ग्रहाच्या संक्रमणाने कोणकोणत्या राशींना सावध राहण्याची गरज आहे ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

मंगळ ग्रह वृषभ राशीच्या आठव्या चरणात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या कालावधीत तुमच्या खर्चावर परिणाम होऊ शकतो. मुलांशी संबंधित काही अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच, कामाच्या ठिकाणी वरिष्ठ सहकाऱ्यांबरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

कन्या रास (Virgo Horoscope)

मंगळ ग्रह या राशीच्या चौथ्या चरणात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या कालावधीत तुमच्या कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता आहे. तसेच, करिअरमध्ये अनेक उतार-चढाव येऊ शकतात. कामाच्या बाबतीत तुम्ही संतुष्ट नसाल. आरोग्याच्या बाबतीत देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे. मानसिक तणाव तुम्हाला जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात कोणताही निर्णय घेताना 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांच्या बाराव्या चरणात हे संक्रमण होणार आहे. या काळात काहीशी तणावपूर्वक परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच, तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे वादविवाद होऊ शकतात. व्यवसायात प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागू शकतो. तसेच, शारीरिकदृष्ट्या तुम्ही स्वत:ला फार कमकुवत समजाल. या काळात कोणतीही पैशांची गुंतवणूक करु नका. 

हे ही वाचा :                                                    

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 3 December 2025 : आज बुधवारच्या दिवशी 5 राशींवर प्रसन्न होणार बाप्पा! मागाल ती इच्छा होईल पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य