Mangal Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहाचं (Mangal Gochar) संक्रमण फार खास मानण्यात आलं आहे. त्यानुसार, येत्या 27 ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रहाचं स्वत:च्याच राशीत म्हणजेच वृश्चिक राशीत संक्रमण होणार आहे. जेव्हा पण मंगळ ग्रह आपल्या स्वराशीत प्रवेश करतो तेव्हा शुभ राजयोग निर्माण होतो. हा एक शक्तिशाली पंच महापुरुष योग आहे. 

Continues below advertisement

ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाचं संक्रमण फार महत्त्वाचं मानलं जातं. कारण मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हणतात. मंगळ ग्रह आपल्या चालीत परिवर्तन करतात, योग बनवतात किंवा संक्रमण करतात त्याचा सरळ परिणाम मानवासह जगभरात पाहायला मिळतो. त्यामुळे मंगळ ग्रहाचं संक्रमण कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मंगळ ग्रहाचं संक्रमण मिथुन राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. हा काळ तुमच्यासाठी फार शुभ ठरणार आहे. या काळात तुमच्या कामात गती येईल. तुमच्यातला आत्मविश्वास वाढेल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होतील. या काळात तुमच्यातील नेतृत्वक्षमता दिसून येईल, तसेच, तुमच्या आरोग्यात सुधारणा झालेली दिसेल. फक्त या काळात तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. 

Continues below advertisement

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी मंगळ ग्रहाचं संक्रमण शुभकारक ठरेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. या काळात नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

मंगळ ग्रहाचं संक्रमण कन्या राशीसाठी फार लकी ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये नवीन बदल घडण्याची शक्यता आहे. तसेच, नवीन जबाबदाऱ्या आणि प्रमोशन मिळू शकतं. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची निर्णयक्षमता चांगली दिसून येईल. या काळात व्यवहाराच्या बाबतीत संयम गरजेचा आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी मंगळ ग्रहाचं हे संक्रमण फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडताना दिसतील. तसेच, पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ फार लाभदायी ठरणार आहे. अनावश्यक खर्चात वाढ होईल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी हा काळ फार भाग्याचा ठरणार आहे. तसेच, या काळात तुमच्या प्रगतीचे मार्ग उपलब्ध होतील. तसेच, परदेशात जाण्याच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढलेली दिसेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :     

Diwali 2025 : दिवाळीनंतरच्या रात्रीपासूनच 'या' 3 राशींचं रातोरात पालटणार नशीब; देवी लक्ष्मीच्या कृपेने झटक्यात सुरु होतील 'अच्छे दिन'