Mars Transit In Aries : नुकताच मंगळ ग्रहाने आपल्या मूळ राशीत, म्हणजेच मेष (Aries) राशीत प्रवेश केला आहे. मंगळ ग्रहाने 1 जूनला दुपारी 3 वाजून 27 मिनिटांनी मेष राशीत प्रवेश केला. मंगळाच्या (Mars) चालीचा परिणाम हा प्रत्येक राशीवर होत असतो. मंगळ ग्रहाने केलेल्या राशी परिवर्तनामुळे 3 राशींचं भाग्य उजळेल, त्यांना या काळात आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. या राशींच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. आता या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मंगळाचा मेष राशीत प्रवेश तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो . कारण मंगळ तुमच्या राशीचा स्वामी आहे. तसेच, मंगळ तुमच्या राशीतून स्वर्गीय घरामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे करिअरच्या दृष्टीकोनातूनही हे संक्रमण तुमच्यासाठी सर्वच बाबतीत अनुकूल असणार आहे. या काळात तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल. जे विवाहित आहेत, त्यांचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तसेच, या काळात तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते. भागीदारीच्या कामात तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचा राशी बदल अनुकूल ठरू शकतो. कारण हे संक्रमण तुमच्या राशीतून नवव्या घरात होत आहे. त्यामुळे या काळात नशीब तुम्हाला साथ देईल. तसेच तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. या काळात तुम्हाला चांगले उत्पन्न आणि यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. तुमचे कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक सुधारतील. तसेच या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ राहील.
कर्क रास (Cancer)
मंगळाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी अद्भूत ठरू शकतात. कारण मंगळ तुमच्या राशीतून कर्म गृहात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात मोठे यश मिळेल. व्यापारी वर्गातील लोक आपला नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. तसेच तुम्हाला अधिक नफाही मिळेल. तसेच जे बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. या काळात नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते. या काळात तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: