Mangal Gochar 2024 : सध्या मंगळ (Mars) ग्रह स्वतःच्या राशीत म्हणजेच मेष राशीत (Aries Horoscope) भ्रमण करत आहे. 12 जुलै रोजी तो वृषभ राशीत (Taurus Horoscope) प्रवेश करणार आहे. वृषभ राशीमध्ये राहून, देवगुरु गुरुसोबत साधारण 46 दिवस युती होईल, त्यानंतर 26 ऑगस्टला मंगळ मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. साधारण दीड महिना वृषभ राशीत राहून तो या सहा राशीच्या लोकांना लाभ देणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
मेष राशीचा स्वामी मंगळ आता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या काळात तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होईल. नोकरदार वर्गाला आपल्या कामातून समाधान मिळेल. या काळात तुम्हाला धार्मिक सहलीला जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, वाहन जपून चालवा.
सिंह रास (Leo Horoscope)
मंगळ ग्रहाचा सिंह राशीत लवकरच प्रवेश होणार आहे. या राशीच्या लोकांच्या व्यावसायिक समस्या सुटतील. यामुळे व्यवसायात फायदेशीर संधी निर्माण होतील आणि तुम्ही व्यवसायात नवीन पद्धतींचा अवलंब करू शकाल. जर तुमचे पैसै रखडले असतील तर तुम्हाला ते परत मिळू शकतात. वडिलांच्या पूर्ण सहकार्याने तुमची कामे होतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
या राशीच्या लोकांना व्यावसायिक जीवनात उत्तम संधी मिळतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारलेली दिसेल. तसेच, तुमची सर्व प्रलंबित कामे या काळात पूर्ण होतील. या काळात नशीबाची साथ तुम्हाला मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. धार्मिक गोष्टींमध्ये रुची वाढेल, प्रवासाचे योगही जुळून येतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
या राशीत काम करणाऱ्या लोकांना करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल आणि नवीन नोकरीची ऑफरही मिळू शकते. या काळात जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही करू शकाल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याबरोबरच वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या नोकरदार वर्गाला या दरम्यान चांगल फायदा होईल. तुमच्या पदात वाढ झालेली दिसेल. तसेच, व्यापाऱ्यांना नफा मिळण्याबरोबरच व्यवसायात गुंतवणूक करता येईल. विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळेल. मुलाची वाट पाहणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तसेच, करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. व्यापारी वर्गाला चांगले यश मिळेल आणि भविष्यासाठी बचतही करता येईल. कौटुंबिक वादातून आराम मिळेल आणि घरात काही शुभ कार्य घडतील. नशिबाने साथ दिली तर अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :