Mangal Aditya Rajyog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, 2026 या नवीन वर्षात एक खास ग्रहांचा योग (Yog)जुळून येणार आहे. 19 फेब्रुवारी 2026 रोजी सूर्य देव सतभिषा नक्षत्रात संक्रमण करणार आहे. त्यानंतर 3 मार्च 2026 रोजी मंगळ ग्रहसुद्धा याच नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या दरम्यान शतभिषा नक्षत्रात सूर्य आणि मंगळ ग्रह एकत्र स्थित असणार आहेत. यामुळे मंगलादित्य राजयोग (Rajyog) निर्माण होणार आहे. 

Continues below advertisement

ज्योतिष शास्त्रानुसार, हा राजयोग धन, यश आणि मान-सन्मानात वृद्धी करणारा आहे. हा शुभ योग 5 राशींसाठी सर्वात जास्त लाभदायक ठरणार आहे. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा योग फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच, नोकरदार वर्गातली लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांचं या काळात भाग्य उजळणार आहे. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य आहे. तसेच, परदेशात प्रवासाला जाण्याचे योगदेखील जुळून येणार आहेत. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्यामुळे सिंह राशीवर चांगला प्रभाव दिसून येईल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. राजकीय क्षेत्रात तुमचा वावर असेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग भाग्याचा ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये अनेक बदल निर्माण झालेले दिसतील. तुमचे विचार अधिक दृढ होतील. पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्यांना चांगा लाभ मिळेल. तसेच, उत्पन्नाचे नवे सोर्स तुमच्यासमोर उपलब्ध असतील. जोडीदाराचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. 

हे ही वाचा :                                                                       

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Sade Sati : शनीच्या साडेसातीचे काय असतात परिणाम? साडेसातीपासून वाचण्यासाठी करा 'हे' उपाय