Malavya Rajyog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र (Venus) ग्रहाला धन-संपत्ती आणि वैभवाचा कारक ग्रह मानला जातो. शुक्र ग्रह एका ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतात. त्यामुळे अनेक प्रकारचे राजयोग निर्माण होतात. ज्योतिष शास्त्रात 5 महापुरुष राजयोग आहेत. यामध्ये मालव्य राजयोग फार महत्त्वाचा आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रह 30 जून रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मालव्य राजयोग निर्माण होईल. त्यामुळे या काळात अनेक राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी राजयोगाचा काळ फार अनुकूल असणार आहे. या काळात तुमची नक्षत्र कुंडली लग्न स्थानी आहे. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात चांगले बदल दिसून येतील. तसेच, वैवाहिक जीवन तुमच्यासाठी फार चांगलं ठरेल. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. तुमची लोकप्रियता वाढेल. समाजात तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, या काळात तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या दिसतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोगाचा काळ फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काम करता येईल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. जे लोक नोकरीच्या शोधात असतील त्यांना या काळात चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, नवीन ऑर्डर्स देखील तुम्हाला मिळू शकतात. आई-वडिलांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असेल.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग फार सकारात्मक ठरणार आहे. या काळात शुक्र ग्रह तुमच्या राशीत भाग्याच्या स्थानी आहे. त्यामुळे तुम्हाला लाभ मिळेल. तसेच, धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुम्ही व्यस्त व्हाल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. तुमच्या कामातून तुमची लोकप्रियता दिसून येईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                        

Lucky Zodiac Signs : 26 जूनला 'या' 5 राशींवर असणार दत्तगुरुंची कृपा; धनसंपत्तीची भरभराट, यश आणि प्रगतीचे मार्ग होतील मोकळे