Malavya Rajyog Effect : ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला धन-संपत्तीचा दाता म्हटलं जातं. शुक्र ग्रह (Venus) एक वर्षांनंतर आपल्या स्वराशीत म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करणार आहे. प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात. या दरम्यान, अनेक शुभ-अशुभ योगांची निर्मिती होते. या योगाचा सर्व 12 राशींच्या (Zodiac Signs) लोकांवर परिणाम होतो. 


18 सप्टेंबर रोजी शुक्र ग्रह आपल्या स्वराशीत म्हणजेच तूळ राशीत संक्रमण करणार आहे. या दरम्यान मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. 


मालव्य राजयोगाच्या निर्माणामुळे अनेक राशीच्या लोकांना याचा शुभ परिणाम मिळणार आहे. या दरम्यान तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुमची करिअर आणि बिझनेसमध्ये चांगली प्रगती होईल. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, मालव्य राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना लाभ होणार आहे ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


सध्या शुक्र ग्रह या राशीच्या सातव्या चरणात विराजमान होणार आहे. त्यामुळे मालव्य राजयोगाचा निर्मिती याच चरणात होणार आहे. या राशीच्या लोकांना व्यापार आणि नोकरीत चांगलाच लाभ होणार आहे. या काळात तुम्हाला प्रमोशनसह वेतनातही चांगली वाढ होईल. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर या काळात तुम्हाला चांगलं यश मिळेल.  


व्यापारी वर्गातील लोकांना या काळात चांगला लाभ होऊ शकतो. तुम्ही एखादी नवीन बिझनेस डील साईन करु शकता. तुमचं वैवाहिक जीवन देखील चांगलं असेल. 


तूळ रास (Libra Horoscope)


ज्योतिष शास्त्रानुसार, तूळ राशीच्या लग्न भावात मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा योग फार बलशाली ठरणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे या काळात पूर्ण होतील. तुमची आर्थिक समस्या दूर होईल. तसेच, आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या अकराव्या चरणात मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. हा काळ धनु राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला अपार धनलाभ होईल. तसेच, कुटुंबियांबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल. बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला आपल्या मेहनतीचं फळ मिळेल. पदोन्नतीसह तुमच्या उत्पन्नातही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखी असेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Astrology : तूप-गुळाचा वापर रातोरात बदलेल तुमचं नशीब; बुधवारच्या दिवशी बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय