Makar Sankranti 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, आज मकर संक्रांतीचा(Makar Sankranti 2026) दिवस फार खास असणार आहे. कारण आजच्या दिवशी तब्बल तीन शुभ योग जुळून आले आहेत. हिंदू पंचांगानुसार, आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी आणि वृद्धी योगासह अनेक शुभ योग निर्माण झाले आहेत. वृद्धी योग धन, यश, संपत्ती, बुद्धी आणि सौभाग्याशी संबंधित आहे. 

असं म्हणतात की या शुभ योगात केलेल्या कार्यातून तुम्हाला यश मिळण्याची शक्यता असते. आजच्या दिवशी हा शुभ योग सराळी 7 वाजून 55 मिनिटांनी सुरु झाला आहे. तर, रात्री 8 वाजून 37 मिनिटांपर्यंत हाशुभ योग असणार आहे. हा शुभ योग तीन राशींसाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी हा योग लाभदायी आहे. या दिवशी तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ होईल. तसेच, जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. घरात आनंदाचं वातावरण असेल. तसेच, पती-पत्नीच्या नात्यात गोडवा पाहायला मिळेल. आरोग्याच्या संबंधित तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. या कालावधीत तुम्ही लांब यात्रेच्या प्रवासाला जाऊ शकता. या काळात मित्र-मैत्रीणींचा सपोर्ट तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा वृद्धी योग संपत्तीत भरभराट करणारा असणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, तुमच्या व्यवसायाला चांगली गती मिळेल. एखाद्या दिर्घकालीन आजारापासून तुमची सुटका होईल. तसेच, लवकरच धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे. पगारात वाढ झाल्यामुळे तुमचं मनही प्रसन्न राहील. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी हा योग शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. तसेच, धनलाभाचे अनेक शुभ योग जुळून येतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात भविष्याच्या संदर्भात तुम्ही एखादी चांगली योजना सुरु करु शकते. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले पैसे मिळतील. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Makar Sankranti 2026 Wishes : मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश