Makar Sankranti 2023: नवीन वर्ष 2023 (New Year 2023) सुरू झाले आहे. मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2023) सण यंदा 15 जानेवारीला साजरा होत आहे. मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. भारतातील विविध भागात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण आहे.


 


सूर्याचा मकर राशीत प्रवेश 
ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीपासूनच ऋतू बदलण्यास सुरुवात होते. तेव्हापासूनच वसंताचे आगमन सुरू होते. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, पूजा आणि तीळ खाण्याची परंपरा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यपूजेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की यामुळे जीवनात नवीन ऊर्जा, सामर्थ्य, तेज आणि आरोग्य प्राप्त होते. जाणून घेऊया या दिवशी सूर्यदेव कसे प्रसन्न होऊ शकतात.


 



मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व


हिंदू मान्यतेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात. पौराणिक कथेनुसार, जेव्हा सूर्यदेव पहिल्यांदा शनिदेवाच्या घरी गेले तेव्हा त्यांनी त्यांचे स्वागत काळे तीळ देऊन केले. यामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले. तेव्हा आपले घर संपत्तीने भरले जाईल असा आशीर्वाद त्याने दिला होता. या कारणास्तव दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला काळ्या तिळाची पूजा केली जाते. मकर संक्रांतच्या दिवशी दिवशी स्नान आणि दानासह भगवान सूर्याची पूजा करण्याचा नियम आहे. असे मानले जाते की, या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्यास सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. 


 



अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करावे


मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय केले जाऊ शकतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत साधना करता येते. साधना करण्यापूर्वी स्नान करून पूर्वेकडे तोंड करून बसावे. तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात कुंकू आणि लाल रंगाची फुले टाकून सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावे. तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी सूर्यदेवाला प्रार्थना करा. यानंतर सूर्यदेवाची आरती करावी.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Shani Dev : या शनिवारी शनिदेवाला करा प्रसन्न, शनिवार असेल खूप खास, बनतोय शुभ संयोग