Mahashivratri 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, महाशिवरात्रीला (Mahashivratri 2026)हिंदू धर्मात महत्त्वाचं स्थान आहे. या पवित्र दिवसाची भक्त संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. त्यानुसार, 2026 ची महाशिवरात्री येत्या 15 फेब्रुवारी रोजी म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे. यंदाच्या महाशिवरात्रीच्या तिथीबाबत लोकांच्या मनात संभ्रम होता की महाशिवरात्री नेमकी 15 की 16 फेब्रुवारीला साजरी करायची. 

मात्र, शास्त्रानुसार, 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजून 35 मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे. 

महाशिवरात्री पूजेची योग्य वेळ 

महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी जाणार असाल तर कोणत्याही वेळेत तुम्ही जाऊ शकता. मात्र, जर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असेल तर रात्रीची वेळ उत्तम ठरणार आहे. 

महाशिवरात्री : 15 फेब्रुवारी 2026, रविवार

निशित काल पूजेची वेळ : 12:09 रात्री ते 1:01 रात्री, (16 फेब्रुवारी)

कालावधी : 51 मिनिटे

शिवरात्री पारणाची वेळ : सकाळी 6:59 ते दुपारी 3:24

प्रथम प्रहर पूजेची वेळ : संध्याकाळी 6:11 ते रात्री 9:23

दुसरी प्रहर पूजा वेळ : रात्री 9:23 ते दुपारी 12:35, (16 फेब्रुवारी)

तिसरी प्रहर पूजा वेळ : 12:35 मध्यरात्री ते 3:47 मध्यरात्री, (16 फेब्रुवारी)

चतुर्थ प्रहर पूजेची वेळ : पहाटे 3:47 ते सकाळी 6:59, (16 फेब्रुवारी)

चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:04 वाजता सुरू होईल.

चतुर्दशी तिथी 16 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:34 वाजता संपेल.

जलाभिषेक का करावा?

भगवान शंकराला जल, गंगाजल, दूध, दही, तूप, मध, बेलपत्र, शमी पत्र, भस्म आणि चंदन अर्पण करावा, अनेक लोक पार्थिव शिवलिंग बनवून अभिषेक करतात. शिवलिंगावर जल चढवण्याचे विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही पवित्र मनाने जलाभिषेक केला तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच, तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल अशी मान्यता आहे. 

महाशिवरात्रीला 'हे' काम नक्की करा 

जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असतील किंवा उत्पन्न कमी येत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवा. पहाटे लवकर उठून स्नान करा. तसेच, शिव मंदिरात जाऊन गंगाजनले अभिषेक करा. यावेळी ऊं नम: शिवाय या मंत्राचा जप करा. 11 वेळा शंकराच्या पिंडीला बेलपत्र चढवा. तसेच, दिवसभर उपवास ठेवा. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 11 February 2026 : आजचा दिवस 8 राशींसाठी संकटाचा, तर, 4 राशी असतील निवांत, वेळोवेळी लागणार संकटाची चाहूल, आजचे राशीभविष्य