Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जल चढवण्याचा 'हा' आहे शुभ मुहूर्त; आत्ताच नोट करुन घ्या अचूक वेळ
Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जल चढवण्याची सर्वात योग्य वेळ कोणती याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

Mahashivratri 2026 : हिंदू पंचांगानुसार, आज म्हणजेच 15 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरात महाशिवरात्री (Mahashivratri 2026) साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक केल्यास मनुष्याची पापापासून मुक्ती होते आणि जीवनात सुख शांती नांदते अशी मान्यता आहे. तसेच, महाशिवरात्रीची पूजा मुख्यत्वे रात्रीच्या वेळी केली जाते. याचं कारण म्हणजेच रात्रीच्या वेळी आध्यात्मिकदृष्ट्या फार ऊर्जावान आणि फलदायी मानले जाते.
मात्र, महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जल चढवण्याची सर्वात योग्य वेळ कोणती याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
जलाभिषेकचा सर्वात शुभ मुहूर्त 2026
महाशिवरात्रीच्या पूजेच्या सर्वात प्रभावी काळ हा 'निशिता काळ' असतो. यंदा महाशिवरात्रीचा निशिता काळ 16 फेब्रुवारी रोजी रात्री 12.09 वाजता सुरु होणार आहे. तर, 01 वाजून 01 मिनिटांपर्यंत हा काळ असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, याच वेळेत भगवान शंकर निराकार पासून साकार रुपात प्रकट झालेले होते. त्यामुळे या 52 मिनिटांच्या कालावधीत केलेला जलाभिषेक तसेच मंत्र जापाचा अधिक लाभदायी ठरतो.
महाशिवरात्री पूजेची योग्य वेळ
महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी जाणार असाल तर कोणत्याही वेळेत तुम्ही जाऊ शकता. मात्र, जर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असेल तर रात्रीची वेळ उत्तम ठरणार आहे.
महाशिवरात्री : 15 फेब्रुवारी 2026, रविवार
निशित काल पूजेची वेळ : 12:09 रात्री ते 1:01 रात्री, (16 फेब्रुवारी)
कालावधी : 51 मिनिटे
शिवरात्री पारणाची वेळ : सकाळी 6:59 ते दुपारी 3:24
प्रथम प्रहर पूजेची वेळ : संध्याकाळी 6:11 ते रात्री 9:23
दुसरी प्रहर पूजा वेळ : रात्री 9:23 ते दुपारी 12:35, (16 फेब्रुवारी)
तिसरी प्रहर पूजा वेळ : 12:35 मध्यरात्री ते 3:47 मध्यरात्री, (16 फेब्रुवारी)
चतुर्थ प्रहर पूजेची वेळ : पहाटे 3:47 ते सकाळी 6:59, (16 फेब्रुवारी)
चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:04 वाजता सुरू होईल.
चतुर्दशी तिथी 16 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5:34 वाजता संपेल.
जलाभिषेक का करावा?
भगवान शंकराला जल, गंगाजल, दूध, दही, तूप, मध, बेलपत्र, शमी पत्र, भस्म आणि चंदन अर्पण करावा, अनेक लोक पार्थिव शिवलिंग बनवून अभिषेक करतात. शिवलिंगावर जल चढवण्याचे विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही पवित्र मनाने जलाभिषेक केला तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच, तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल अशी मान्यता आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















