Mahashivratri 2026 : यंदा महाशिवरात्रीला ग्रहांचं 'ट्रिपल संक्रमण'; 15 फेब्रुवारीचा दिवस 'या' राशींसाठी खास, महादेवाचा मिळणार आशीर्वाद
Mahashivratri 2026 Grah Gochar : द्रिक पंचांगानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी एक दुर्लभ ग्रहांचा संयोग जुळून येणार आहे. या दिवशी ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह धनिष्ठा नक्षत्रात संक्रमण करणार आहे.

Mahashivratri 2026 Grah Gochar : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शिवभक्तांसाठी (Lord Shiva) महाराशिवरात्रीचा (Mahashivratri 2026) काळ हा विशेष महत्त्वाचा असतो. या दिवशी भक्त महादेवाची पूजा करतात. उपवास धरतात. त्यानुसार आज (15 फेब्रुवारी 2026) रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. हा दिवस धार्मिकतेबरोबरच ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने देखील फार महत्त्वाचा असणार आहे. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. याचा प्रभाव सर्व राशींवर (Zodiac Signs) होणार आहे.
द्रिक पंचांगानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी एक दुर्लभ ग्रहांचा संयोग जुळून येणार आहे. या दिवशी ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह धनिष्ठा नक्षत्रात संक्रमण करणार आहे. तर, चंद्र मकर राशीत प्रवेश करेल. या व्यतिरिक्त रात्री जवळपास 9 वाजता बुद्धी आणि व्यवसायाचा कारक बुध ग्रह पूर्वाभाद्रपद नक्षत्रात संक्रमण करणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी ग्रहांचं संक्रमण लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्या दूर होतील. तसेच, मानसिक ताण कमी होईल. करिअरच्या संबंधित अनेक चांगले परिणाम मिळतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीचा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात अविवाहित लोकांना विवाहाशी संबंधित शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. तसेच, भविष्यात तुम्हाला चांगली संधी मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्याल लोकांसाठी महाशिवरात्रीचा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी घेतलेल्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. तुमच्या घरातील वातावरण आनंदी असेल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमच्या मनात दडलेली इच्छा पूर्ण होईल. या कालावधीत तुमच्या आरोग्यातही चांगले बदल दिसून येतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















