Mahashivratri 2026: महाशिवरात्रीची रात्र गेमचेंजर, 3 राशींच्या आयुष्यात मोठा यू-टर्न! चंद्राचा शनिच्या राशीत प्रवेश, भोलेनाथांच्या कृपेने गोल्डन टाईम सुरू, कोणत्या राशींची लॉटरी?
Mahashivratri 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, 15 फेब्रुवारी रोजी, महाशिवरात्रीला चंद्र शनिच्या मकर राशीत संक्रमण करेल. या संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊया.

Mahashivratri 2026: महाशिवरात्री...हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस...हा दिवस भगवान शंकराला समर्पित दिवस आहे. भगवान भोलेनाथ..जे एखाद्यावर प्रसन्न झाले, तर त्या व्यक्तीच्या आयुष्याचं सोनं होतं. ज्योतिषशास्त्रात चंद्राला एक शुभ ग्रह मानले जाते. चंद्राची स्थिती तुमच्या मनावर, शारिरीक आणि तुमच्या आर्थिक आणि कौटुंबिक जीवनावर परिणाम करते. चंद्र फक्त अडीच दिवस राशीत राहतो, परंतु हे अडीच दिवस देखील एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर खोलवर आणि मोठे परिणाम करू शकतात. महाशिवरात्रीला, 15 फेब्रुवारी, रात्री 12:41 वाजता, चंद्र शनीच्या मकर राशीत संक्रमण करेल. चंद्राच्या या संक्रमणामुळे तीन राशींना फायदा होऊ शकतो. या भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया.
मेष (Aries)
ज्योतिषशास्त्रानुसार, महाशिवरात्री आणि त्यानंतरचा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असू शकतो. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला अनपेक्षित परिणाम मिळतील आणि काहींना तुमच्या इच्छित ठिकाणी नोकरीही मिळू शकेल. तुमच्या कामाच्या नीतीमुळे वरिष्ठांवर प्रभाव पडेल. भगवान शिवाच्या आशीर्वादाने, तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणातही अनुकूल परिणाम मिळतील आणि त्यांची एकाग्रता वाढू शकते.
तूळ (Libra)
ज्योतिषशास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या रात्रीपासून तुमच्या जीवनात आनंद निर्माण होईल, तुमच्या पालकांसोबतचे तुमचे संबंध सुधारतील. जर तुम्ही जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी करू इच्छित असाल तर तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नोकरी शोधणाऱ्यांनाही रोजगार मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आरोग्यातही सकारात्मक बदल येतील आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या सक्षम वाटेल. तुम्हाला भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतील.
मकर (Capricorn)
ज्योतिषशास्त्रानुसार, महाशिवरात्रीपासून तुम्हाला मानसिक शांती लाभेल. घरात आनंद राहील. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक जीवनातही तुम्हाला सकारात्मक बदल जाणवू शकतात. तुमच्या योजना यशस्वी होतील आणि या काळात व्यवसायिकांनाही नफा मिळू शकेल.
हेही वाचा
Weekly Lucky Zodiac Signs: पैसा चुंबकासारखा, 5 राशींचं नशीब जोरात! फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात धन-बुधादित्य राजयोगानं लागणार लॉटरी, साप्ताहिक भाग्यशाली राशी..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















